Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या दोन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दोन पदके

जामखेडच्या दोन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दोन पदके

0
2

जामखेड न्युज——–

जामखेडच्या दोन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दोन पदके

आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत जामखेड येथील दोन खेळाडूंची एक रौप्य व एक कांस्यपदकांची कमाई केली आहे.

वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तसेच जेके टायर प्रस्तुत यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग टूर्नामेंट कप 2026 दिनांक 4 ते 8 फेब्रुवारी रोजी के.डी.जाधव इंनडोअर इंदिरा गांधी स्टेडिय,दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये भारतीय संघामध्ये जामखेड येथील दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून 91 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता तसेच परराज्यातील व परप्रांतीय देश पॅलेस्टाईन, उझबेकिस्तान, इराक, इटली, कझाकिस्नान, स्विझर्लंड ,नेपाळ, युरोप या सोबतच 25 देशातील खेळाडूंचा समावेश होता.

जामखेड येथील 14 वर्षा आतील वयोगटात -37 वजन गटात कुमारी ईश्वरी राजेंद्र बोराटे हिने लाईट कॉन्टॅक्ट प्रकारामध्ये फायनल सामन्यात परराज्यातील खेळाडू सोबत लढत करून रोप्य पदक प्राप्त केले.तसेच 17 वर्षांपुढील -56 किलो वजन गटात कुमारी शिवानी भाऊसाहेब वीर हिने लो- किक प्रकारामध्ये सेमी फायनल सामन्यात परराज्यातील खेळाडू सोबत लढत करून कांस्यपदक प्राप्त केले.

आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग विजय खेळाडूंच्या यशामागे किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन जामखेड जिल्हाध्यक्ष व प्रशिक्षक ज्ञानेश्वर(माऊली) जमदाडे, राघवेंद्र धनलगडे, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, आंतरराष्ट्रीय पंच सचिन मकासरे यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले.

पदक वितरण प्रसंगी वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन(इंडिया) अध्यक्ष- संतोष अग्रवाल, किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष- निलेश शेलार, सचिव-धीरज वाघमारे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. तसेच विजयी प्राप्त खेळाडूंनी त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

तसेच नगराध्यक्ष प्रांजल (ताई )अमित चिंतामणी, नगरसेवक सागर (भाऊ) टकले, नगरसेवक संजय( काका) काशीद, नगरसेवक महेश (दादा )निमोणकर यांनी खेळाडूंचे कौतुक करत आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!