काळोबा माध्यमिक विद्यालय शिक्षण क्षेत्रातील आदर्श विद्यालय होणार – डॉ. संजय भोरे

0
235
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
      स्वर्गीय विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून आदर्श व दर्जेदार शिक्षण देणार असून कुसडगाव पंचक्रोशीत यामुळे शैक्षणिक क्रांती घडेल
व शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श विद्यालय म्हणून थोड्याच दिवसात या विद्यालयाचा नावलौकिक होईल असे प्रतिपादन नवजीवन मेडिकल अॅन्ड एज्युकेशन फौडेंशन जामखेड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी केले.
        जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील स्वर्गीय .विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगांव या विद्यालयाचे नवजीवन मेडिकल अॅन्ड एज्युकेशन फौडेंशन जामखेड या संस्थेत नुकतेच हस्तांतरण झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय भोरे सचिव व प्राचार्या अस्मिता भोरे, संचालक दगडु (आण्णा) पवार पाटील, चंद्रकांत हुलगुंडे, तेजस भोरे, यशराज भोरे कुसडगांवचे सरपंच बाप्पुसाहेब कार्ले, उपसरपंच नागेश कात्रजकर, पोलीस पाटील निलेश वाघ, मनसे नेते तथा उद्योजक   दादासाहेब (हवाशेठ) सरनोबत, माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले, जेष्ठ नागरिक व शिक्षणप्रेमी नारायण कात्रजकर गुरूजी, गोरखनाथ भोगल (गुरुजी), राष्ट्रवादीचे युवा नेते प्रसन्ना कात्रजकर, केशव कात्रजकर, अमोल कार्ले, पप्पू कात्रजकर, ग्रामपंचायत सदस्य शहाजी गाडे, गणेश कार्ले , सुनील कार्ले, भरत भोगल, संतोष भोगल . खांडवीचे उपसरपंच दिपक नेटके, संतोष भोगल, पाडळी येथील स्व एम ई भोरे ज्युनियर काॅलेजचे प्रा. बहिर सर, कसाब सर, डिसले सर, भोंडवे सर , कदम सर, स्वाती पवार मॅडम सनराईज इंग्लिश स्कूलचे प्राचार्य काळे सर, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाडळीचे सातपुते सर, सुषमा भोरे मॅडम, महेश पाटील, बुवासाहेब दहिकर, हनुमंत वाघमारे, दिनकर सरगर, सभांजीराजे ज्युनियर काॅलेज देवदैठणचे प्राचार्य दादासाहेब मोहिते सर, कुसडगांवच्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनेरे सर, अब्दुले सर, पठाडे सर, काळे मॅडम, होशिंग मॅडम, आबा कात्रजकर, रामभाऊ टिळेकर, महारनवर आदी मान्यवरांसह व ग्रामस्थ उपस्थित होते.
       या वेळी कुसडगांवचे सरपंच बाप्पुसाहेब कार्ले म्हणाले की यासंस्थेला ग्रामपंचायत, पालक व ग्रामस्थांंमार्फत हवी ती मदत केली जाईल तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय भोरे यांच्या जामखेड तालुक्यातील  सर्वोत्कृष्ट दर्जेदार शैक्षणिक संस्थेच्या रूपाने या शाळेला एक नवसंजीवनी मिळाली आहे ही शाळा एक तालुक्यात आदर्श बनवून कुसडगांव  नावलौकिक होईल अशी आम्हाला खात्री आहे .
यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ संजय भोरे यांनी ही शाळा  या पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक शिक्षक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने  आदर्श व दर्जेदार शिक्षण देणारी करूत अशीही ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बहिर सर यांनी केले तर आभार सातपुते सरांनी मानले केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here