जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कर्जत-जामखेडचे कार्यकुशल आमदार आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, रक्तदान शिबीर, मोफत दंतरोग तपासणी शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना १०,००० वह्यांचे वाटप या सामाजिक उपक्रमांबरोबरच शहरातील विविध नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या नियुक्तीपत्रांचे आ. रोहित (दादा) पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी उत्स्फुर्तपणे काम करून एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.
राज्याचे युवा नेतृत्व आ.रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारींच्या उपस्थितीत जामखेडमध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, कोअर कमिटीचे सदस्य उमरभाई कुरेशी, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, माजी ग्रा.पं सदस्य संजय डोके, इस्माईल सय्यद, हरिभाऊ आजबे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष राजेंद्र सदाफुले, प्रा.अशोक गायकवाड, युवा कार्यकर्ते समीर चंदन, अजिंक्य ठोकळ, दादा महाडिक, मनोज कार्ले, सचिन शिंदे, ऋषी कुंजीर, सुनील सदाफुले, सुहास आव्हाड, प्रा.राहुल आहिरे, रतन काळे, प्रशांत मेनकुदळे, महेश ससाणे, शिवाजी पोकळे, दादा काटकर, प्रशांत वाघ, नामदेव मेनकुदळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी होणाऱ्या रक्तदान शिबीरातसाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा याचे नियोजन करणे, कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांना याबाबत अवगत करुन रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे व जास्तीत जास्त नावनोंदणी करुन सहकार्य करणे, दंतरोग तपासणी शिबिरासाठी जनजागृती करणे, गरजू विद्यार्थ्यांना १०,००० वह्यांचे वाटप करण्यासाठीच्या नियोजनसाठी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे व आ. रोहित (दादा) पवार यांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात यावा. यादृष्टीने नियोजनाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या नेतृत्वाखाली व जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी आ.रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन शहराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी केले.