सौताडा  धबधबा येथे  एका ५३ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला- खुन कि आत्महत्या चर्चेला उधाण

0
328
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) 
जामखेड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सौताडा धबधबा येथे  एका महिलेचा मृतदेह सापडला असून हा मृतदेह २० सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास काही पर्यटकांना दिसला होता. या वेळी धबधब्यावरून उडी मारलेली असावी असा प्राथमिक अंदाज असून नेमका हा खून आहे की आत्महत्या यांचा तपास पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनिष पाटील, पोलीस कर्मचारी सुनील सोनवणे व  अशोक तांबे हे  करत आहेत.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
      संध्याकाळी ६ च्या सुमारास सौताडा गावातील युवकांच्या मदतीने प्रेत पाण्यातून बाहेर काढण्याचे आले यावेळी असे समजत आहे की धबधब्याच्या जवळ  एक पर्स मोबाईल आशा वस्तू सापडले आहे यावरून मयताची ओळख पटली असुन मृत असलेले महिलेचे वय वर्ष 53 च्या आसपास असुन महिलेचे नाव रोहिणी सोमेश्वर कुलकर्णी राहणार नगर असे आहे रामेश्वर पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असून येथील निसर्ग रम्य धबधबा पाहण्यासाठी व श्री क्षेत्र रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज ये जा करतात आज दि.२० सप्टेंबर सोमवार रोजी येथील काही पर्यटकांना हा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.त्यांनी लगेंच पोलिसांना कळवण्यात आले व पाण्यातून प्रेत सौताडा गावातील युवकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. व पुढील तपासा साठी ग्रामीण रुग्णालय पाटोदा येथे हलवण्यात आले. यावेळी विशाल मस्के, संदीप गायकवाड, राहुल मस्के, नितीन शिंदे, अशोक सानप, प्रशांत घुले, आकाश मस्के, बाबा उबाळे व यांचे सहकारी यांनी खूप सहकार्य केले असुन पोलीस निरीक्षक मनीष पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सुनील सोनवणे,अशोक तांबे हे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here