जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आगामी काळात आधुनिक माॅडलस्च्या ई-व्हेईकलस् व लाखो रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी टूनवाल उद्योग इ-व्हेईकल क्षेत्रात लवकरच क्रांती करेल. असे प्रतिपादन टुनवाल ई-व्हेईकल उद्योग समुहाचे चेअरमन जुमरमलजी टूनवाल यांनी व्यक्त केले.
जामखेड येथील एच.यु गुगळे उद्योग समुहाचे वतीने जामखेड येथे ई-व्हेईकल शो-रूम सुरू करण्यात आले आहे. या शो-रूममधून टूनवाल या कंपनीच्या विविध माॅडेलच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या मागचे “गमक” काय आहे. हे पाहण्यासाठी त्यांनी जामखेड येथील नगर रोडवरील एच. यु. गुगळे या ई-व्हेईकल दालनास भेट दिली. तसेच यानंतर एच.यु. गुगळे बायोटेक या युनिटला भेट दिली. यावेळी आदरपूर्वक त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गुगळे उद्योग समुह रमेशभाऊ गुगळे, राजीवजी कचोरीया, एच. यु. गुगळे बायोटेकचे सिईओ रविंद्र कडलग, तांत्रिक विभाग प्रमुख विजय पाटोळे, निलेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्रीमान जूमरमलजी टूनवाल यांनी उद्योगातील अनेक बाबींवर मनमोकळी चर्चा केली. यावेळी त्यांनी सुरू केलेल्या टूनवाल ई-व्हेईकल बाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की,
आमच्या Tunwal कंपनीच्या विविध माॅडेलच्या सुमारे दिड लाख इलेक्ट्रिक बाईक रस्त्यांवर आहेत. तसेच आम्ही निर्मीती व विक्री बाबत अनेक उपाय योजना हाती घेतल्या असून लवकरच या क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करू असा विश्वास वाटतो.
आज आम्ही अनेक अडचणींवर मात करून या क्षेत्रात नवीन पायंडे पाडले आहे. सद्याच्या परिस्थितीत व आगामी काळात ई-व्हेईकलस् ही जगाची गरज असणार आहे. कारण पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे भारतालाच नव्हे तर जगाला ग्लोबल वार्मींग व प्रदुषणाच्या मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते आहे. इलेक्ट्रिक्स गाड्यांमुळे कंपनी व ग्राहक यांच्या बरोबर सरकारचा मोठा फायदा होत आहे. कारण त्याव्दारे वाहन धारकांचे दररोज किमान एक लिटर जरी पेट्रोल वाचले तरी Tunwal कंपनीच्या माध्यमातून सरकारचे दिड लाख लिटर पेट्रोलची बचत होत आहे. यामुळे सरकारचीही तेवढीच पेट्रोल आयात करण्यासाठी लागणारे रक्कम सुद्धा वाचत आहेत. तसेच त्यामुळे होणारे प्रदूषण होत नाही. हाही सरकारचा फायदा होत आहे. व याव्दारे पर्यावरणाचेही रक्षण होण्यासही मदतच होत आहे.
दरम्यान नव उद्योजकांनासाठी सल्ला देताना चेअरमन जुमरमलजी टूनवाल यांनी सांगितले की, कोणत्याही कामाची सुरूवात करणे कठीण असते. मात्र त्याच कामाला यश मिळाले की काम करणाऱ्यास मिळणारे यश व लोकप्रियता मोठी असते. कोणत्याही क्षेत्रात संशोधन करण्यात ९०% अपयश येण्याची शक्यता १० % यशाची खात्री असते मात्र देशासाठी काहीतरी करण्याची उमेद अशा व्यवसायत येतात त्यांच्यातच असते. एखाद्या बाबतीत जर संकटे आली तर चारही बाजूंनी येतात मात्र आपण संयम ढळू न देता त्याला धिराने सामोरे गेले पाहिजे. एकदा अशी वेळ आमच्यावरही आली होती. आमच्याही कंपनीला आग लागून सर्व संपले होते. मात्र पुन्हा सर्व गोष्टी पुर्वीसारख्या होत आहेत.
तसेच या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या स्पर्धेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ई-व्हेईकल क्षेत्रात नवनवीन कंपन्या येत आहेत. नुकतेच ओला कंपनी ई-व्हेईकलच्या मार्केटमध्ये आल्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. स्पर्धा असेल तरच व्यवसाय वाढू शकतो. कारण ग्राहकांच्या आवडी निवडी ही वेगवेगळ्या असतात. त्यामुळे स्पर्धा नसेल तर ग्राहकांना नवनवीन माॅडेल मिळणार नाहीत. जरी कंपन्या वेगवेगळ्या असल्या तरी त्या प्रोडक्ट्सचे मेन स्ट्रक्चर एकच असते फक्त डिझाईन वेगवेगळे असते. पेट्रोल बाईक मार्केटमधेही अनेक कंपन्या आहेतची की! अवरेज बद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, बॅटरीच्या क्षमतेवर हे अंतर अवलंबून असते ५० कि. मी. पासून १५० किमी पर्यंत ई-व्हेईकलच्या माध्यमातून प्रवास करता येऊ शकतो. बाईकच्या वैशिष्ट्यांची माहीती देताना टुनवाल ई-व्हेईकल उद्योग समुहाचे प्रमुख जुमरमल टूनवाल म्हणाले की. जशी ग्राहकांची मागणी येत आहे त्यानुसार सद्या १२ प्रकारचे माॅडलस् बाजारात आणले आहेत. यामध्ये पाच माॅडल जास्त बॅटरी पावरचे आहेत. यामुळे अवघड व लांबचा प्रवास करणे शक्य होणार आहे. तसेच पेट्रोल पंपासारखेच ई-व्हेईकलसाठी विविध ठिकाणी सरकारच्या वतीने चार्जिंग पाॅईंट निर्माण केले जात आहेत. त्या आधारेही आपण जास्तीचा प्रवास करू शकतो.
याच बरोबर बायोटेकच्या माध्यमातून केळी व डाळिंब या क्षेत्रात एच.यु. गुगळे समुहाकडून होत असलेले काम हे परोपकारी व पुढील पिढीसाठी भवितव्य निर्माण करणारे काम असून हेच खरे सामाजिक कार्य आणि हेच खरे समाजाचे हिरो आहेत असे मी मानतो. अशीही प्रतिक्रिया उद्योजक जूमरमल टूनवाल यांनी व्यक्त केली.
शेवटी रविंद्रजी कडलग यांनी उपस्थित मान्यवर व पत्रकारांचे आभार व्यक्त केले.