जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
तालुक्यात चिकणगुण्या व डेंग्यू आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नानेवाडी गावात ग्रामपंचायतच्या वतीने डासांचा बंदोबस्त करण्यासाठी संपुर्ण गावात फवारणी करण्यात आली त्यामुळे डेंग्यू व चिकणगुण्या आजाराला आळा बसेल असे सरपंच सारीका डोंगरे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
नानेवाडी (मोहा) येथे चिकनगुण्या आजारांनी मोठ्या प्रमाणात रोग पसरला होता साधारण 100 रुग्ण या आजाराचे होते ग्रामस्थ यांनी अनेक वेळा सोशल मीडिया च्या माध्यमातून याचा आवाज उठवला होता व अनेक तक्रारी देखिल केल्या गेल्या होत्या तसेच ग्रामपंचायतवरही नाराजी व्यक्त केली होती.
संबंधित लोकांची भावना लक्षात आल्या नंतर तात्काळ याची दखल ग्रामपंचायत यांनी घेवून फवारणी पंप इतर व साहित्य आणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संपुर्ण गावात फवारणी केली.
आरोग्य कर्मचारी व अधिकारी सध्या कोरोना लसीकरणासाठी व्यस्त आहेत त्यामुळे इतर आजाराने काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी डेंग्यू व चिकनगुण्याचे मोठ्या प्रमाणावर रूग्ण आहेत. खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल आहेत तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब योग्य त्या उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.
जामखेड न्युजशी बोलताना सरपंच सारीका डोंगरे यांनी सांगितले की, लोकांच्या आरोग्य अबाधित राखण्यासाठी ग्रामपंचायत सर्व प्रकारची मदत करेल.










