नवनियुक्त गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे रोहोकले गुरुजी प्रणित गुरूमाऊली मंडळ व शिक्षक बँकेच्या वतीने सत्कार

0
199
जामखेड प्रतिनिधी 
        जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग व रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळ जामखेड व शिक्षक बँक जामखेडच्या वतीने नव्याने हजर झालेले गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना माननीय गटविकास अधिकारी यांनी आगामी काळातील शैक्षणिक धोरणाविषयी तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी संघटनेस पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष राम निकम, शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र मोहळकर, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष हनुमंत निंबाळकर, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण पवार, जिल्हा प्रतिनिधी  शिवाजी हजारे, नारायण लहाने, वैजिनाथ गिते, राजेंद्र हजारे, विकास हजारे भागवत निंबाळकर, दीपक तांबे, उपाध्यक्ष, संतोष वांढरे, प्रमोद पिंपरे, गणेश चव्हाण, विठ्ठल जाधव, अभिमान घोडेस्वार, राजेश्वर दुंपलवाड आदी शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here