Tuesday, September 29, 2026
Home ताज्या बातम्या आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती याविषयी माजी जिल्हाधिकारी कन्नन गोपीनाथन यांचे जामखेड...

आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती याविषयी माजी जिल्हाधिकारी कन्नन गोपीनाथन यांचे जामखेड येथे व्याख्यान

0
249
आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती याविषयी माजी जिल्हाधिकारी कन्नन गोपीनाथन यांचे जामखेड येथे व्याख्यान

जामखेड प्रतिनिधी

          जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
  आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती विषयी युवक क्रांती दल आयोजित माजी जिल्हाधिकारी कन्नन गोपीनाथन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तरी युवकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
        गुरूवार दि. १६ रोजी सोले काॅम्लेक्स दुसरा मजला बीड काॅर्नर येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. अप्पा अनारसे शेतकरी नेते व सहकार्यवाहक युक्रांत हे असतील.
     केंद्र सरकारच्या काही धोरणावरून मतभेद झाल्यावर दादरा नगर हवेली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत  असलेले आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी राजीनामा दिला व ग्रामीण भागातील युवकांसाठी व्याख्याने देत संपुर्ण देशात फिरत आहेत. सध्या ते ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आहेत. जामखेड तालुक्यातील तरूणांना त्यांचे विचार समजावेत आणी प्रेरणा मिळावी म्हणून व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक विशाल राऊत, विजय घोलप, विशाल नेमाने, अजय नेमाने, अनिल घोगरदरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!