जामखेड न्युज – – –
केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केल्याने त्याचा परिणाम सोयाबीनचा दरावर होणार का ?
केंद्र सरकारने जरी खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली असली तरी निर्यात करणारे देश एकतर निर्यात शुल्क वाढवतात किंवा व्यापारी दर वाढवून निर्यात करतात असा आजवरचा बाजारचा अनुभव आहे.
सोयाबीनची यंदा पेरणी लांबल्याने बाजारामध्ये सोयाबीन येण्यासाठी उशीर होत आहे. पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झालेले आहे आणि त्याचा उत्पादकते वरही परिणाम झालेला आहे आणि भारतात सोयाबीनचा साठा कमी आहे.काही शेतकऱ्यांनी लवकर लागवड केली होती त्यामुळे काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सध्या दाखल होत आहे. या आलेला सोयाबीनला चांगला दर मिळत आहे
मात्र केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोयाबीनला चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची आशा आहे. जुनेकीय सुधारित सोया पेंट आयातीला दिलेले परवानगी आणि तसेच खाद्य तेल आयात शुल्कात कपात केल्याने जाणकारांच्या मते या दोन्ही निर्णयांचा देशांतर्गत बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे.
आपला देश 70 टक्के खाद्यतेल आयात करतो. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या पण काही घडामोडी होतात त्याचा थेट परिणाम आपल्या देशातील तेलांचा भावावर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तेलाचे 70 ते 80 टक्क्यांनी भाव वाढले आहेत. भारतातील तेलाचे भाव कमी ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केले जेणेकरून देशांमध्ये जास्त प्रमाणात आयात होईल आणि पुरवठा जास्त वाढल्यामुळे भाव तेलाचे वाढणार नाहीत.
1. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय सोयाबीनला मोठी मागणी.
2.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे अजूनही भाव वाढत आहेत.
3. देशात सोयाबीनचा शिल्लक साठा नाही.
4. पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.










