जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – –
घाटमाथ्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील खैंरी मध्यम प्रकल्प आज दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पुर्ण क्षमतेणे भरला असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे. मात्र लाभक्षेत्रात पाऊसही सातत्याने सुरू असल्याने मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पुरपरिस्थितीती निर्माण होऊन जिवीत हानी होऊ नये यासाठी लाभक्षेत्रातील जनतेने सतर्क राहून आपल्या जिवीताची व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून ग्रामपंचायतसह गावातील स्थानिक यंत्रणांनी दवंडीव्दारे जनजागृती करावी असे आवाहन खैरी मध्यम प्रकल्पाचे प्रभारी व खर्डा शाखेचे शाखा अभियंता गणेश काळे यांनी केले आहे. तसेच याबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले असून संबंधितांना पाठवण्यात आले आहेत.
जामखेड तालुक्यात खैंरी मध्यम प्रकल्प हा एकमेव मध्यम प्रकल्प असून त्याची एकूण पाणी पातळी. ५६२.३० मिटर, एकुण साठा ५३३.६० (द.ल.घ.फु.), उपयुक्त साठा. १३.७४० (द.ल.घ.मी.) उपयुक्त साठा. ४८५.२२ (द.ल.घ.फु.) असा असून यावर्षी या भागात एकुण पाऊस. १९५.०० व (मि.मी.) इतका पाऊस पडल्याने तसेच सतत पाऊस सुरूच असल्याने आज दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी ४:१० वाजता पुर्ण क्षमतेने भरून साडव्याव्दारे विसर्ग सुरू झाला आहे. तालुक्यातील भुतवडा, नायगाव, मोहरी, काझेवाडी हे आठ दिवसांपुर्वीच पुर्ण क्षमतेने भरलेले होते आता तालुक्यातील सर्वात मोठे धरण खैरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
साधारण जामखेड तालुक्यातील सातेफळ, वाकी, लोणी, बाळगव्हाण, दौंडवाडी, आपटी, खर्डा, तरडगाव, सोनगाव, धनेगाव, तर उस्मानाबाद जिल्हा परांडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक व पांढरेवाडी शिवारातील शेकडो शेतकऱ्यांना या प्रकल्पातून शेतीसाठी पाणी दिले जाते. तसेच सन २०१५ – २०१६ साली निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक गावांनाही याच प्रकल्पातून पाणी पुरवठा केला होता.
सद्या खैंरी मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्याने तसेच सततच्या पावसामुळे पाणीपातळी वाढून परिसरात कोणतीही जिवित किंवा मालमत्तेचेची हानी होऊ यासाठी जामखेड लघु पाटबंधारे उपविभागाचे उपविभागिय अभियंता अविनाश फडतारे यांचे मार्गदर्शनाखाली, खैरी सिंचन शाखा खर्डाचे शाखाधिकारी गणेश काळे हे परिस्थितीवर लक्ष ठेवण्याबरोबरच आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत.










