जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवार आज दि. ७ सप्टेंबर रोजी जामखेड दौऱ्यात असून तालुक्यातील विविध ठिकाणी जलपुजन व पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागची ते पाहणी करणार आहेत. आ. रोहित पवार यांच्या कार्यालया मार्फत मिळालेल्या माहितीनुसार दि. ७ रोजी तालुक्यातील जातेगाव येथून त्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे.
आज दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता जातेगावं येथे पूर परिस्थिती पाहणी, ९ : २५ वाजता दीघोळ येथे पूर परिस्थिती पाहणी.१० वाजता मोहरी तलाव येथे जलपूजन, सकाळी १० :३० वाजता तेलंगशी तलाव जलपूजन, सकाळी ११ :१० नायगांव तलाव जलपूजन, सकाळी ११:५० बांधखडक नदी खोलीकरण पाहणी, दुपारी १२:४० भूतवडा जलपूजन व तलाव पाहणी, दुपारी १:२० काझेवाडी तलाव जलपूजन, दुपारी १:५० वाजता कुसडगाव शेती नुकसान पाहणी करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमासाठी संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
आमदार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे





