जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील साकत येथिल गोशाळेतील बैलांची गावातून मिरवणूक काढून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाच्या वतीने बैलपोळा साजरा करण्यात आला. मिरवणूक झाल्यानंतर गोशाळेतील धारकऱ्यांनी बैलांची
व गायींची पूजा करून, मंगल आष्टके म्हणत बैलाचे लग्न लावण्यात आले.
हिंदू संस्कृती नुसार श्रावण महिन्यात येणार्या पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. या सणाला शेतकरी त्यांच्या एकूणच परिवारासह अंत्यत उत्साहात हा सण साजरा केला जातो.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरूमकर, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाचे तालुका प्रमुख पांडुरंग भोसले, श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाच्या वतीने अनेक सामाजिक कामे केली जात आहेत. तालुक्यातील विविध सार्वजनिक प्रश्नांसाठी अंदोलनं, कोरोना काळात गोरगरीबांसाठी केलेले अन्नदान, पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करून पोहच करणे अशी एक ना अनेक कामे लोकोपयोगी कामे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाच्या वतीने केली जात आहेत.





