Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या माजी सैनिकांच्या कुटुंबीच्या संरक्षण देण्याबद्दलच्या जिल्हास्तरीय समितीमध्ये जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून मेजर...

माजी सैनिकांच्या कुटुंबीच्या संरक्षण देण्याबद्दलच्या जिल्हास्तरीय समितीमध्ये जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून मेजर बजरंग डोके यांची निवड

0
272
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
     महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून सैनिकांच्या कुटुंबीच्या संरक्षण देण्याबद्दलच्या जिल्हास्तरीय समिती पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केली असून जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून बजरंग डोके यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. त्यांचा नुकताच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाघचौरे यांनी त्यांच्या सत्कार केला.
       सैनिकांच्या कुटुंबीच्या संरक्षणासाठी व सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी जिल्हास्तरीय समिती स्थापन केली असून जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून मेजर बजरंग डोके यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाघचौरे यांनी त्यांचा सन्मान केला.
    मेजर बजरंग डोके यांच्या सामाजिक कार्य पाहता त्यांची जामखेड तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या सन्मानाबद्दल ते म्हणाले की,
 तो माझा सन्मान नसुन जामखेड तालुक्यातील सर्व माजी सैनिकांचा सन्मान आहे केवळ तो मी स्विकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!