Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांची बदली झाल्यामुळे पंचायत समिती मध्ये सत्कार संपन्न

गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांची बदली झाल्यामुळे पंचायत समिती मध्ये सत्कार संपन्न

0
383

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
    जामखेड पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी दोन वर्षात गरजू व वंचित घटकांपर्यंत घरकुलांचा लाभ मिळवून दिला तसेच जेवढ्या विहिरी मंजूर होत्या त्या सर्व सुरू केल्या आणी गेल्या दिड वर्षापासून कोरोना काळात उत्कृष्ट काम करत जामखेड पंचायत समितीला तीन पारितोषिके मिळवून दिले त्यांची बदली नंदुरबार जिल्ह्य़ात तळोदा येथे झाली त्यामुळे जामखेड पंचायत समितीमध्ये त्यांचा निरोपाचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
          यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, उपसभापती रवी सुरवसे, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, आपटीचे सरपंच नंदू गोरे, आनंदवाडीचे ग्रामपंचायत सदस्य भारत होडशीळ, भरत जगदाळे, राहुल चोरगे, कांतीलाल डोके, टिल्लू पंजाबी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
      २३ सप्टेंबर २०१९ मध्ये परशुराम कोकणी यांची जामखेड पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आगोदर जामखेड पंचायत समितीमध्ये प्रभारी राज होते. कोकणी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री व रमाई घरकुल योजनेत सर्व सामान्य गरजू व वंचित घटकांपर्यंत घरकुलांचा लाभ मिळवून दिला त्यामुळे महाआवास अभियानात विभागीय स्तरावरील प्रथम पारितोषिक मिळाले तसेच जिल्हा स्तरावरील दोन पारितोषिक मिळाले तसेच ७७ विहिरींना मंजुरी मिळाली होती त्या सर्व रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू केल्या तसेच गेल्या दिड वर्षापासून कोरोना काळात लॉकडाऊन आसतानाही कामात खंड पडू दिला नाही याचबरोबर ग्रामपातळीवर कोरोना कमिट्या स्थापन करून कोरोना नियंत्रणासाठी चांगले काम केले त्यामुळे कोरोनाची गती तालुक्यात कमी झाली. परशुराम कोकणी यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल पंचायत समितीला तीन पारितोषिक मिळाले. त्यांची बदली झाली त्यामुळे आज त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
    यावेळी जामखेड न्युजशी बोलताना गटविकास अधिकारी परशुराम कोकणी म्हणाले की, जामखेड तालुका हा काम करण्यासाठी खुपच चांगला तालुका आहे. येथील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या सहकार्याने जामखेड पंचायत समितीला तीन पारितोषिक मिळाले आहेत. मी सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!