जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे बाजार समित्यांनी सातत्याने केलेली मागणी व खरिप हंगामासाठी असणारी गरज लक्षात घेऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून जिल्हातील सर्व जनावरांचे बाजार सुरू करावेत असा निर्णय झाला असून त्याबाबतचा आदेश जिल्हा उपनिबंधक तसेच बाजार समीत्यांना कळविण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दि. १ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हा आदेश जारी जारी केला असला तरी कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जनावरांचा बाजार सुरू करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार शनिवार दि. ४ सप्टेंबर रोजी जामखेडचा बैल बाजार सुरू करण्यात येणार आहे.