Friday, November 20, 2026
Home शैक्षणिक बातम्या विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञानाची नवी दारे खुली! ल. ना. होशिंग विद्यालयात १५ दिवसांची...

विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञानाची नवी दारे खुली! ल. ना. होशिंग विद्यालयात १५ दिवसांची मोफत एआय कार्यशाळा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिनव उपक्रम, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन

0
4
विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञानाची नवी दारे खुली! ल. ना. होशिंग विद्यालयात १५ दिवसांची मोफत एआय कार्यशाळा   अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिनव उपक्रम, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जामखेड न्युज – – – – 

विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञानाची नवी दारे खुली! ल. ना. होशिंग विद्यालयात १५ दिवसांची मोफत एआय कार्यशाळा

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिनव उपक्रम, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन

आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असताना विद्यार्थ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, त्याचा शैक्षणिक उपयोग समजावा आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांची तयारी व्हावी, या उद्देशाने दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जामखेड येथील ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष एआय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यानुभव उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा दि. १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत घेण्यात येत आहे. शिक्षणतज्ज्ञ राष्ट्रपती पारितोषिक विजेते अ. ल. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एआय सिटिझनशीप प्रोग्राम अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नचिकेत इंगळे, शिवानी इंगळे, खुशी पंडित, श्वेता गायकवाड, जितामित्र कुलकर्णी आणि परीक्षित विशे हे विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉक्टर सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात.

सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असून कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण, संशोधन, उद्योग, आरोग्य आणि दैनंदिन जीवन अशा विविध क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच एआयची माहिती मिळावी, त्यांच्यात तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी तसेच आधुनिक साधनांचा योग्य आणि जबाबदारीने वापर करण्याची जाणीव विकसित व्हावी, या दूरदृष्टीतून विद्यालयाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्यासह विद्यालयातील सर्व अध्यापक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावर वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याच्या दृष्टीने ल. ना. होशिंग विद्यालयाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!