जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेल्या कुकडी व सिनाच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी केलेला पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे कर्जत-जामखेडच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे भाग्य उजळले आहे.कित्त्येक वर्षे रखडलेली भु-संपादनाची रक्कमही शेतकऱ्यांना मिळवुन देण्यात त्यांना यश आले आहे. सन २०१९-२० ,२०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षांच्या कालखंडात तर शेकडो कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या मंजुऱ्या मिळवुन व सर्व कामे दर्जेदारपणे पुर्ण करून कुकडी आणि सिनाचे ‘ना भुतो ना भविष्य’ केलेले पुनरुज्जीवन मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणातही मान उंचावणारे आहे.कुकडी व सिनाबाबत असलेल्या अडचणी समजुन घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक शासकीय अधिकारी,सिंचन भवन ते थेट मंत्रालयापर्यंत बैठका घेऊन केलेला पाठपुरावा आज प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा देणारा आहे.जलसंपदा विभाग,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत कर्जत व जामखेड येथे सिंचन प्रापनसुची अंतर्गत आणि बिगर प्रापनसुची अंतर्गत कुकडी-सिनाची रखडलेली आणि नवीन प्रस्तावित शेकडोहुन अधिक कामे मार्गी लावण्यात आली.
जामखेड तालुक्यातील सन २०१९-२० मध्ये बिगर सिंचन प्रापनसुची अंतर्गत खैरी मध्यम प्रकल्प ता. जामखेड शिर्ष विमोचकास गंजविरोधी रंगकाम व भरावाची पॅरापिट ऑलचे रंगकाम,जवळा,सांगवी,पिंपरखेड,कवडगा,गिरवली को. प. बंधाऱ्यांचे लोखंडी बर्गे काढणे,बसवणे रंग देणे. सन २०१९-२० मध्ये सिंचन प्रावनसुची अंतर्गत खैरी मध्यम प्रकल्प सा. क्र.०/१००ते ०/२९५ मधील अष्मपटल दुरुस्ती,ल.पा तलाव मोहरी अष्मपटल दुरुस्ती. सन २०२०-२१ मध्ये बिगर सिंचन प्रावनसुची अंतर्गत ल. पा. तलाव,धोंड पारगाव सांडवा दुरुस्ती व भराव मजबुतीकरण,जवळा, सांगवी,पिंपळखेड,कवडगा, गिरवली को. प. बंधाऱ्यांचे लोखंडी बर्गे काढणे,बसवणे व रंग देणे,सिंचन प्रावनसुची अंतर्गत ल. पा. तलाव भुतवडा (जुना) अष्मपटल दुरुस्ती,ल. पा. तलाव मोहरी देखभाल दुरुस्ती,खैरी मध्यम प्रकल्प सा. क्र.०/४५० ते ०/७८० मधील अष्मपटल दुरुस्ती ही कामे झाली आहेत आणि सन २०२१-२२ मध्ये बिगर प्रावनसुची अंतर्गत खैरी मध्यम प्रकल्प ता. जामखेड पुच्छ कालवा संरक्षक भरावाचे अष्मपटलाची व एफ डब्लू दुरुस्ती,ल. पा. तलाव तेलंगशी,रत्नापुर, जवळके सांडवा दुरुस्ती व भराव व मजबूतीकरण,ल. पा. तलाव पिंपळगाव आळवा कालवा बांधकामे,विमोचके व लाइनिंग दुरुस्ती,जामखेड उपविभागीय कार्यालय अंतर्गत सर्व ल. पा. तलावांची उंची वाढवण्याचे बाह्य अभिकरणाद्वारे सर्वेक्षण करणे,को. प. बंधारा सांगवी ता. जामखेड भराव व दोन्ही बाजुस गॅबीयन भिंत बांधकाम करणे,जवळा, सांगवी, पिंपरखेड,कवडगा,गिरवली येथील को. प. बंधाऱ्यांचे लोखंडी बर्गे काढणे बसवणे व त्यास रंग देणे. आदी कामे मार्गी लागली आहेत.
चौकट:
*जामखेड तालुक्यात वर्षानिहाय मंजूर केलेली व प्रस्तावित कामे:*
सन २०१९-२० मध्ये १६.६७ लक्ष रुपयांची कामे मंजूर करून पुर्ण करण्यात आली.
सन २०२०-२१ मध्ये ४२.४९ लक्ष रुपयांची कामे मंजूर करून पुर्ण करण्यात आली.
सन २०२१-२२ मध्ये २५४.८५ लक्ष रुपयांची कामे मंजुर केलेली आहेत.









