जामखेड न्युज – – –
जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 555 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nagarzp.gov.in
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.औषध निर्माता – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
2.आरोग्य सेवक (पुरुष) – 187 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. 02. ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा 12 महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
3.आरोग्य सेविका (महिला) – 352 जागा
शैक्षणिक पात्रता – ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील..
4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)
वयाची अट – 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]
वेतन – 5,200/- to 1,12,400/-
नोकरीचे ठिकाण – अहमदनगर (महाराष्ट्र).Ahmednagar Zilla Parishad Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.nagarzp.gov.in









