Home ताज्या बातम्या ADCC बँक निवडणुकीत ट्विस्ट – प्रा. राम शिंदे उद्या ठोकणार शड्डू “तिसऱ्या...

ADCC बँक निवडणुकीत ट्विस्ट – प्रा. राम शिंदे उद्या ठोकणार शड्डू “तिसऱ्या अपत्याच्या वादात शिंदेंची उमेदवारी वाचणार की जाणार?”

0
4
ADCC बँक निवडणुकीत ट्विस्ट – प्रा. राम शिंदे उद्या ठोकणार शड्डू “तिसऱ्या अपत्याच्या वादात शिंदेंची उमेदवारी वाचणार की जाणार?”

जामखेड न्युज – – – – – 

ADCC बँक निवडणुकीत ट्विस्ट – प्रा. राम शिंदे उद्या ठोकणार शड्डू

“तिसऱ्या अपत्याच्या वादात शिंदेंची उमेदवारी वाचणार की जाणार?”

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC) 21 संचालक पदांसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. बिनविरोधच्या चर्चेला सुरुंग लावत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उद्या सोमवारी (दि. 5 ऑक्टोबर) कर्जत आणि जामखेड सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट आरोप केला आहे की, प्रा. राम शिंदे यांना तीन अपत्ये आहेत. त्यामुळे सहकार कायद्यानुसार ते जिल्हा बँक निवडणूक लढवू शकत नाहीत. विधान परिषदेच्या सभापतींनाच कायदा माहित नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रा. शिंदे यांनी स्वतः यावर खुलासा केला आहे.”सर्व बाबींचा सारासार विचार करूनच मी फॉर्म घेतला आहे आणि तो निश्चितपणे भरला जाईल” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे. तसेच “मी कोणत्याही संस्थेचा थकबाकीदार नाही, अंतिम निर्णय निवडणूक निर्णय अधिकारीच घेतील”

30 सप्टेंबर रोजी प्रा. शिंदे यांनी निवडणूक कार्यालयातून 2 कोरे अर्ज घेतले होते. आता उद्या ते शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.
सध्या 541 पेक्षा जास्त अर्जांची विक्री झाली असून बँक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे, असा दावा स्वतः प्रा. शिंदे यांनी केला आहे.

तिसरे अपत्य नियम – नेमका कायदा काय सांगतो?

या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा होत आहे ती तिसऱ्या अपत्याच्या नियमाची. अनेक दिग्गज नेते यामुळे अडचणीत येऊ शकतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 (क-अ) नुसार 1. कट-ऑफ तारीख: 7 सप्टेंबर 2001 नंतर तिसऱ्या अपत्याचा जन्म झाला असेल तर ती व्यक्ती सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरते.
2. 2001 पूर्वीची अपत्ये ग्राह्य नाहीत: 7 सप्टेंबर 2001 पूर्वी 3 किंवा अधिक अपत्ये असतील तर अपात्रता लागू होत नाही.

3. महत्त्वाची पळवाट / सूट
जुळी/तिळी अपत्ये: एकाच प्रसूतीमध्ये 2 किंवा 3 अपत्ये झाली आणि त्यामुळे मुलांची संख्या 3 झाली, तर तो अपात्र ठरत नाही. कायद्याने याला सूट दिली आहे.

-एक वर्षाची सूट: कायदा लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत (म्हणजे 6 सप्टेंबर 2002 पर्यंत) जन्मलेले तिसरे अपत्य अपात्रतेत धरले जात नाही.
– दत्तक अपत्य: दत्तक घेतलेले मूल या नियमात मोजले जात नाही.

जर एखाद्या उमेदवाराला 2001 नंतर तिसरे अपत्य झाले असेल आणि ते जुळे नसेल, तर त्याचा अर्ज छाननीत बाद होऊ शकतो.

प्रा. राम शिंदे यांच्या उमेदवारीचे गणित

कर्जत तालुक्यात 75 सोसायटी मतदारांपैकी 57 मतदार प्रा. शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांत मतदारांना देवदर्शन सहलीवर पाठवून त्यांनी मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. तसेच जामखेड तालुक्यातील अनेक सोसायटीचे मतदार प्रा राम शिंदे यांच्या बरोबर आहेत अशी चर्चा सध्या जामखेड तालुक्यात आहे.

तिसऱ्या अपत्याचा नियम आणि RBI चा 10 वर्ष संचालक पदाचा कूलिंग ऑफ पीरियडचा नियम – या दोन निकषांवर अनेक जुन्या संचालकांच्या अर्जावर आक्षेप येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रा. शिंदे यांच्यासारख्या नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते. उद्या अर्ज दाखल झाल्यानंतरच अहिल्यानगर जिल्हा बँकेचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

चौकट

दबावतंत्र, प्रतिष्ठा कि माघार

सध्या सभापती प्रा राम शिंदे यांनी जिल्हा सहकारी बँक निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. त्या दृष्टीने कर्जत जामखेड मध्ये नियोजन करून ठराव आपल्या बाजूने करून घेतले आहेत मात्र जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध च्या चर्चेच्या मिटिंग साठी सभापती यांना टाळले होते यामुळे त्यांचा इगो दुखावला गेला यामुळे ते जोरदार तयारीला लागले आहेत. आता तिसऱ्या अपत्यामुळे जर अडचण आली तर पर्यायी उमेदवार तयार आहेत तसेच पुढील निर्णय प्रक्रियेत डावलले जाणार नाही यासाठी दबावतंत्र चालले आहे अशीच चर्चा सध्या जामखेड तालुक्यात सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!