Wednesday, September 30, 2026
Home ताज्या बातम्या पाद्यपूजन अन् औक्षणाने भारावले क्षण! न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आजी-आजोबा कृतज्ञता दिवस उत्साहात

पाद्यपूजन अन् औक्षणाने भारावले क्षण! न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आजी-आजोबा कृतज्ञता दिवस उत्साहात

0
2
पाद्यपूजन अन् औक्षणाने भारावले क्षण! न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आजी-आजोबा कृतज्ञता दिवस उत्साहात

जामखेड न्युज – – – – – 

पाद्यपूजन अन् औक्षणाने भारावले क्षण! न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आजी-आजोबा कृतज्ञता दिवस उत्साहात

“॥ श्रद्धावान लभते ज्ञानम् ॥” या संस्कारमूल्यांना केंद्रस्थानी ठेवत दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी विद्यालयात बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी ‘आजी-आजोबा कृतज्ञता दिवस’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. नातवंडांनी आपल्या आजी-आजोबांचे पाद्यपूजन करून औक्षण करत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

त्यामुळे संपूर्ण विद्यालय परिसर भावनिक आणि संस्कारमय वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमादरम्यान आजी-आजोबांचे पाद्यपूजन करून नातवंडांनी त्यांचे औक्षण केले. भारतीय संस्कृतीतील ज्येष्ठांचा सन्मान, कुटुंबातील जिव्हाळा आणि संस्कारांची परंपरा विद्यार्थ्यांना अनुभवता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमात कुमारी मोहिनी दौंड व मुक्ता कोल्हे यांनी सुरेल गवळण व भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच चिरंजीव सत्यजित पवळ व माऊली दौंड यांनी सुंदर अभंग सादर करून कार्यक्रमात भक्तिमय रंग भरला.
या संस्कारक्षम उपक्रमाचे कौतुक करताना श्री. पिसाळ भाऊसाहेब यांनी विद्यालयातील सर्व अध्यापकांचे भरभरून कौतुक केले.

विद्यार्थ्यांमध्ये ज्येष्ठांविषयी आदर, कृतज्ञता आणि कौटुंबिक संस्कार रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य आजी-आजोबांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. यामध्ये श्री. दत्तात्रय श्रीपती काळदाते व सौ. केशरबाई दत्तात्रय काळदाते, श्री. गोविंद बापूराव कोल्हे व सौ. कांताबाई गोविंद कोल्हे, श्री. शंकर दगडू आजबे व सौ. चंद्रकला शंकर आजबे, श्री. पोपट दादाबुआ पिसाळ व सौ. झुंबरबाई पोपट पिसाळ, श्री. हरिभाऊ ज्ञानबा काळदाते व सौ. प्रयागा हरिभाऊ काळदाते, श्री. दगडू शाहूराव कोल्हे व सौ. सुधामती दगडू कोल्हे, श्री. हनुमान अनिरुद्ध काळदाते, श्री. अजिनाथ विश्वनाथ बोरकर, सौ. पार्वती विष्णुपंत लटपटे व श्री. विष्णुपंत सिताराम लटपटे, श्री. बापू सर्जेराव मोरे, श्री. दगडू गोपीनाथ शेलार व सौ. कचराबाई दगडू शेलार यांच्यासह अनेक आजी-आजोबा उपस्थित होते.

कार्यक्रमाची रंजकता आणि उत्साह वाढविण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व अध्यापक-अध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांसोबत घालवलेले हे क्षण आनंद, प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले होते.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेचे तसेच मा. मुख्याध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर आपल्या संस्कृतीतील ज्येष्ठांचा सन्मान, कृतज्ञता आणि कौटुंबिक नात्यांचे महत्त्व यांचा अमूल्य संस्कार मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!