Friday, September 18, 2026
Home ताज्या बातम्या मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये ‘महाआरोग्य यज्ञ’! सात तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती; तपासणी, निदान...

मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये ‘महाआरोग्य यज्ञ’! सात तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती; तपासणी, निदान व आरोग्य सल्ला मोफत

0
3
मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये ‘महाआरोग्य यज्ञ’!  सात तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती; तपासणी, निदान व आरोग्य सल्ला मोफत

जामखेड न्युज – – – – – 

मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये ‘महाआरोग्य यज्ञ’!

सात तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती; तपासणी, निदान व आरोग्य सल्ला मोफत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये नागरिकांसाठी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जगदंब प्रतिष्ठान, जामखेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळणार आहे.

हे महाआरोग्य शिबिर रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज मेनपेठ येथील विठ्ठल मंदिर, जामखेड येथे होणार आहे. जामखेड शहरासह परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शिबिरात डॉ. रोहन टोमके (हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ), डॉ. संजय राऊत (अध्यक्ष, डॉक्टर असोसिएशन जामखेड), डॉ. राजेंद्र पवार, डॉ. सौ. रेखा पवार (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. सौ. विद्या काशीद (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. अशोक बांगर आणि डॉ. अशोक पोते हे तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.

या तपासण्या पूर्णपणे मोफत
शिबिरामध्ये CBC (HB व पेशी तपासणी), BSL (रक्तातील साखर), ECG, SpO₂, रक्तदाब आणि नाडी तपासणी मोफत करण्यात येणार आहे. याशिवाय हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, त्वचारोग, संधिवात, कंबरदुखी, पाठदुखी तसेच अ‍ॅनिमिया यांसारख्या समस्यांबाबत तज्ज्ञांकडून तपासणी व आरोग्य सल्ला दिला जाणार आहे.

या उपक्रमासाठी लॅब असोसिएशनचे अध्यक्ष संजय कोल्हे, महेश यादव, सोमनाथ नांदुर्गे, आदित्य सांगळे तसेच केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश निमोणकर आणि उपाध्यक्ष बाळासाहेब जगदाळे यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. संजय काका काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य तपासणी वेळेवर झाल्यास अनेक आजारांचे निदान व योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. त्यामुळे जामखेड शहर व परिसरातील नागरिकांनी रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विठ्ठल मंदिर येथे उपस्थित राहून या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

आरोग्यदायी समाजासाठी एक पाऊल… जामखेडमध्ये महाआरोग्य शिबिराचा महायज्ञ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!