जामखेड न्युज – – –
महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर कधीही न घडलेली, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची घटना काल घडली. ज्या राज्यातील राजकारणी यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजनितीचे आजवर गोडवे गात होते. तेच राज्य आता पश्चिम बंगाल बिहार वा तामिळनाडूच्या दिशेनं जातंय का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. असो…
2019 च्या निवडणूकीत महाविकासआघाडी सरकार खरं तर खूप अटीतटीच्या लढाईने सत्तेवर आलं. ‘आमचे पैलवान आखाड्यात तेल लावून उभे आहे, आम्हाला समोर कोणताही पैलवान दिसत नाही’ असे म्हणणारे भाजपचे देवेद्र फडणवीस यांच्या पक्षाचे 105 आमदार निवडून आल्यावरही त्यांना सत्तेची खुर्ची मिळवता आली नाही. अर्थात तीन पक्ष एकत्र आल्यावर तसेही ते शक्य नव्हतेच. गेल्या अनेक वर्षांपासून भाजप सेना युती होती. आणि ही युती टिकवण्यात सर्वात मोठा वाटा होता तो स्व. गोपीनाथ मुंडे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा. मात्र मुख्यमंत्री पद भाजप की शिवसेनेला यावरून दुधात मिठाचा खडा पडला आणि सेना भाजप युती संपुष्टात आली. फक्त युती संपली नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले. सत्तेसाठी सरकार तर स्थापन झाले मात्र विचारांची दुही तशीच राहिली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याने आणि पाठिंब्याने सत्तेवर आलेले सरकार पहिले दिड वर्ष व्यवस्थित चालले. मात्र त्यानंतर आघाडीत मतभेद होऊ लागले. जे साहाजिकज होणे अपेक्षितच होते. कारण सत्तेसाठी एकत्र आलेले तीन पक्ष दीड वर्षात विचारांनी एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे या तीन पक्षात कशी फूट पडेल आणि त्याचा फायदा भाजपला कसा होईल याकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लक्ष ठेऊन आहेत. काही अंशी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. मात्र शरद पवार यांच्या शब्दाच्या पुढे कोणीही जायचे नाही या महाविकास आघाडीतील अलिखित नियमांमुळे शरद पवार यांनी तिघाडी व्यवस्थित सांभाळली आणि बांधून ठेवली. मात्र प्रत्येक वेळी आणि प्रत्येक निर्णयात शिवसेना सहकारी पक्षाचे ऐकेल तर ती शिवसेना कसली. त्यामुळे सेनेकडे मुख्यमंत्री पद असून देखील रिमोट दुसऱ्याकडे असल्याची जाणीव वारंवार देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अनेक भाषणांमधून सेनेला करून दिली. आणि इथेच संपूर्ण घोळ झाला.
शिवसेना हळू हळू नाराज होत चालली आहे याची कुणकुण शरद पवारांना लागली. मात्र सेना फक्त नाराज नाही तर भाजपबरोबर जवळीक साधते आहे, हे देखील शरद पवारांच्या लक्षात आले. मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. याचवेळी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची स्वतंत्र बंद दाराआड जवळपास पाऊण तास चर्चा रंगली. आणि त्याच दिवशी शरद पवारांचे खात्रीत रूपांतर झाले, की उद्धव ठाकरे यांचा भाजप बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न चालू आहे. या भेटीत मुंबई महानगर पालिका निवडुक, आगामी लोकसभा निवडणूक, काँग्रेसचा स्वबळाचा नारा यावर सविस्तर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना भाजपच्या दृष्टीने आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप सेनेच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे. याबाबत देखील चर्चा झाली. ही जवळीक शरद पवार यांना न मानवणारी होती. सेना भाजप ची अशीच जवळीक होत राहिली तर महाराष्ट्राला आपण स्थिर सरकार देऊ शकत नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची भीती शरद पवार यांना आहे.
शरद पवारांचा मास्टर प्लॅन
शरद पवार देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील मास्टर खेळाडू आहेत. राज्याच्या राजकारणात कोणतीही घटना घडली की त्याचे कनेक्शन शरद पवार यांच्याशी जोडले जाते. आणि ते बऱ्या अंशी खरे असते. काल देखील नेमके तेच झाले. नारायण राणे यांना वादग्रस्त वक्तव्यावरून पोलिसांनी अटक केली. अटकेचे आदेश देण्यापासून ते अटक होण्यापर्यंत शरद पवार यांना काहीही माहीत नव्हते असे नाही. कारण गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादी कडे आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री आहेत. त्यामुळे अटकेच्या आदेशापासून सर्व घटनाक्रमाची राष्ट्रवादी साक्षीदार आहे.
त्याचबरोबर अशा प्रकारचे चिथावणीखोर आणि बदनामी करणारे वक्तव्य करणारे नारायण राणे हे पहिले नेते नाहीत. स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील असे कमरेखालचे वार आपल्या भाषणात केलेले आहेत. म्हणजे राजकीय दृष्टीने विचार केला तर हे चालूच असते. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य हे शरद पवार यांच्या दृष्टीने अतिशय क्षुल्लक होते. मात्र चालून आलेली संधी शरद पवार कसे सोडतील. जेष्ठ आणि मुरब्बी नेते म्हणून हा वाद ते सोडवू शकत होते. किंवा उद्धव ठाकरे यांना समजावून सांगू शकत होते. उद्धव ठाकरे यांनी देखील वडीलकीच्या नात्याने पवारांचा सल्ला ऐकला असता. मात्र शरद पवार यांना असे काहीही करायचे नव्हते. त्यांना सर्व काही घडू द्यायचे होते. त्यानुसार त्यांनी बरोबर जवळीक साधणाऱ्या भाजप बरोबर सेनेची जुंपून दिली आणि पाहत राहणे पसंद केले. काल झालेल्या नारायण राणे अटकेच्या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही, हेही तितकेच विशेष आहे. नाहीतर अजितदादा पवार बोलल्याशिवाय राहत नाहीत.
एकाच दगडात मारले दोन पक्षी
शरद पवार यांना माहीत होते की सेनेची भाजप सोबतची जवळीक यामुळे कमी होईल. मात्र यामुळे आणखी एक फायदा शरद पवार यांनी यामध्ये पहिला असावा. राज्याच्या भाजपची संपूर्ण धुरा ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. त्यांचाच संपूर्ण होल्ड आहे. मात्र जेव्हापासून नारायण राणे केंद्रात मंत्री झाले तेव्हापासून पक्षाचा बऱ्यापैकी रिमोट हा त्यांनी स्वतःच्या हातात घेतला आहे. नारायण राणे हे शरद पवार यांना मानणारे आहेत. त्यांचा नेहमी ते आदर करतात. मात्र नारायण राणे यांना अटक झाली की राज्यातील भाजप आक्रमक होईल, रस्त्यावर उतरेल. नारायण राणे यांना मोठा पाठिंबा मिळून पक्षातील लोक त्यांच्या मागे उभा राहतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची पत कमी होईल. मागील 5 वर्षात फडणवीस यांनी दिलेल्या त्रासाचा वचपा येथे काढता येईल. या हेतूने शरद पवार सध्या फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.