साकत जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दगडू (दादा) वराट यांची सर्वानुमते निवड! शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा अध्यक्षांचा निर्धार
साकत जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दगडू (दादा) वराट यांची सर्वानुमते निवड!
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा अध्यक्षांचा निर्धार
साकत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दगडू (दादा) वराट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड मागील महिन्यात दि. १४ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आज समितीच्या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली.
या निवडीत अध्यक्षपदासाठी दगडू (दादा) वराट यांच्या नावावर सर्व सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी अमोल सुरेश मुरूमकर व दादा सखाराम घोडेस्वार यांची निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी बिबिषण अरुण वराट, नारायण दामोदर घोलप, सौ. सुनिता साईनाथ जावळे, सौ. चंद्रकांता सुभाष लहाने, सौ. प्रियंका अडसुळ, सौ. दैवशाला बाळकृष्ण सरोदे, सौ. उर्मिला राजू वराट, सौ. रेषमा विष्णू वराट, योगेश मारुती घोडेस्वार, सौ. रंजना परमेश्वर वराट (ग्रामपंचायत सदस्या) तसेच प्रदीप भास्कर कांबळे (शिक्षक प्रतिनिधी) यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वैजनाथ फुलचंद गिते यांची समितीच्या सचिवपदी निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष दगडू (दादा) वराट व सर्व सदस्य यांचे गावातील सरपंच मनिषा पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सदस्य व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले. शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समितीने प्रभावीपणे काम करावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष दगडू (दादा) वराट म्हणाले, “शाळेच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्न करू. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा आणि शाळेचा नावलौकिक वाढावा यासाठी समितीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करू.”
नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधांसह शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला असून, समितीच्या निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.