Saturday, July 25, 2026
Home शैक्षणिक बातम्या आषाढी एकादशीनिमित्त हनुमान मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व अभिषेक भक्तिभावात संपन्न ...

आषाढी एकादशीनिमित्त हनुमान मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व अभिषेक भक्तिभावात संपन्न प्राचार्य बाळासाहेब पारखे व पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा; बाल भजनींच्या सुरेल भजनाने वातावरण झाले भक्तिमय.

0
3

जामखेड न्युज – – – – – 

आषाढी एकादशीनिमित्त हनुमान मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व अभिषेक भक्तिभावात संपन्न

प्राचार्य बाळासाहेब पारखे व पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा; बाल भजनींच्या सुरेल भजनाने वातावरण झाले भक्तिमय.

जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथील हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विठ्ठल-रुक्मिणीच्या नामगजरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

यावेळी ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे व पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व अभिषेक विधिवत संपन्न झाला. वेदमंत्रांच्या घोषात आणि भक्तिमय वातावरणात पूजा पार पडली.

महापूजेनंतर मंदिराच्या वतीने प्राचार्य बाळासाहेब पारखे यांचा श्री व सौ. योगिता देशमुख यांच्या हस्ते, तर पर्यवेक्षक सुदाम वराट यांचा श्री व सौ. संगीता तोरडमल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मंदिराचे विश्वस्त गणेश मासाळ, सचिव कल्याण घायाळ, विश्वस्त संगीता तोरडमल, योगिता देशमुख, प्रवीण होळकर, प्रताप वीर, मंदिराचे पुजारी प्रकाश गुरव, राणीताई वाघमारे, कल्याणी मासाळ, सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख, जगदीश कानडे, पिंटू डुचे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

महापूजा व अभिषेकानंतर बाल भजनींच्या भजनाचा सुंदर कार्यक्रम सादर करण्यात आला. आरोही धर्माधिकारी, ज्ञानेश्वरी काळे, ईश्वरी नागरगोजे व जयहरी नागरगोजे या बालभजनींनी विठ्ठलाच्या अभंगांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना जगन्नाथ धर्माधिकारी, मुरलीधर काळे, ॲड. महारुद्र नागरगोजे, त्र्यंबक वराट तसेच पुरुष व महिला भजनी मंडळातील सदस्यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.

हनुमान मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात. रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, संत रामदास स्वामी रामदास नवमीनिमित्त कीर्तन, दररोज महिला भजनी मंडळाचा हरिपाठ, तसेच प्रत्येक शनिवारी सकाळी ७ वाजता महाआरती आणि रात्री भजन असे नियमित कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांमुळे मंदिर परिसरात सातत्याने भक्तिमय वातावरण निर्माण होत असून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

 

आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमाने विठ्ठल भक्तांना भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचा सुंदर अनुभव दिला. मंदिर परिसर दिवसभर हरिनामाच्या गजराने आणि अभंगांच्या सुरांनी दुमदुमून गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!