जामखेड न्युज – – – – –
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यामुळे वाचले एकाचे प्राण
“वेळेवर रुग्णवाहिका, दरवाजा तोडून काढले बाहेर; आत्महत्येचा प्रयत्न फसला”

सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रसंगावधानामुळे एका तरुणाचे प्राण वाचले.

घडली घटना अशी
शुक्रवार दि. १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी कोठारी यांना फोन आला – “संजू काका, लवकर या! एका मुलाने औषध घेतले आहे. तो बेशुद्ध अवस्थेत पडला असून तोंडाला फेस आला आहे.”

क्षणाचाही विलंब न करता संजू काका स्वतःची रुग्णवाहिका घेऊन सहकारी ऋषिकेश शेळके यासोबत घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती भयंकर होती. ज्या खोलीत तरुणाने विषारी औषध घेतले होते, त्या खोलीला आतून कडी लावलेली होती.

खिडकीतून एका कर्मचाऱ्याने आत पाहिले असता तरुण निपचित पडलेला दिसला. त्याने तातडीने मालकाला कळवले. मालकाने थेट संजय कोठारी यांनाच फोन करून मदत मागितली

दरवाजा तोडला, प्राण वाचवले
कोठारी यांनी घटनास्थळी पोहोचताच क्षणाचाही विचार न करता रूमचा कडी-कोंडा तोडला. आतमध्ये तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या खिशातील आधार कार्डवरून त्याचे नाव अविनाश उमाजी यादव, वय अंदाजे २५, रा. बोर्डेवाडी, ता. शिरूर, जि. बीड असे समजले.




