Home ताज्या बातम्या ICU मध्ये असूनही सहकाऱ्याच्या मस्टरची काळजी करणारे ग्रामरोजगार सेवक अशोक थोरात ”...

ICU मध्ये असूनही सहकाऱ्याच्या मस्टरची काळजी करणारे ग्रामरोजगार सेवक अशोक थोरात ” “जामखेड पंचायत समिती समोर मोटारसायकलच्या अपघातानंतरही कर्तव्याप्रती निष्ठा कायम”

0
4

जामखेड न्युज – – – – – 

ICU मध्ये असूनही सहकाऱ्याच्या मस्टरची काळजी करणारे ग्रामरोजगार सेवक अशोक थोरात ”

“जामखेड पंचायत समिती समोर मोटारसायकलच्या अपघातानंतरही कर्तव्याप्रती निष्ठा कायम”

 

कामाच्या बाबतीत किती प्रामाणिक असावे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अशोक थोरात. ICU मध्ये उपचार सुरू असताना, वेदना सहन करत असतानाही साहेबांनी ऑपरेटर महेश पेचे यांना निरोप दिला “माझे मस्टर ऑनलाइन पेमेंट व्हावे, बघा जरा.”हे ऐकून मन अक्षरशः गहिवरून आले.

१८ वर्षांची निस्वार्थ सेवा
आयुष्यातील तब्बल १८ वर्षे ज्यांनी ग्रामविकासाची जबाबदारी खांद्यावर घेतली, प्रत्येक कुटुंबातील सर्वसामान्य माणसाला न्याय दिला, त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला. तरीही विचार मात्र कर्तव्याचाच!

अपघात आणि तातडीची मदत
पंचायत समितीसमोरच दुर्दैवी घटना घडली. भरधाव मोटारसायकलने थोरात साहेबांना जोराची धडक दिली. शासन उद्या काय विचार करेल हे माहीत नाही, पण त्याच क्षणी आमचे सहकारी रोजगार सहायक मोहन पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता इतरांच्या मदतीने रिक्षा करून साहेबांना तातडीने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले व मला फोन केला. निरोप मिळताच मीही तत्काळ हॉस्पिटलला हजर झालो.

कुटुंब व प्रशासनाची धावपळ
पुढील उपचारासाठी साहेबांचे चिरंजीव तातडीने आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार CT Scan करण्यासाठी दुसऱ्या डायग्नोस्टिक सेंटरला नेऊन सर्व आवश्यक रिपोर्ट्स काढण्यात आले. प्रकृती चिंताजनक असूनही साहेबांची पहिली काळजी “मस्टरचे पेमेंट वेळेत झाले पाहिजे, मजुरांना त्रास नको.”

पोलीस कारवाईसाठी पाठपुरावा
मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची सविस्तर कल्पना दिली. संबंधित दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करावा, घटनास्थळाची पंचनामा करून पाहणी करावी, अशी लेखी विनंती करून जबाब नोंदवला.

घटनेचे गांभीर्य ओळखून गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी स्वतः पोलीस निरीक्षक साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित दुचाकी चालकावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. “कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बाबतीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” अशी भूमिका बीडीओ साहेबांनी मांडली.

सहकाऱ्यांची भावना
“साहेब, तुम्ही फक्त अधिकारी नाही, आमच्यासाठी कुटुंबप्रमुख आहात. ICU च्या बेडवरूनही तुम्ही दुसऱ्याच्या पगाराची काळजी करता, हे पाहून आमच्या डोळ्यात पाणी आले. तुमच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम,” अशी भावना तालुकाध्यक्ष हरीभाऊ वराट यांनी सर्व सहकाऱ्यांच्या वतीने व्यक्त केली.

ईश्वरचरणी प्रार्थना
जामखेड पंचायत समितीतील सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी अशोक थोरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

एक सहकारी
“अधिकारी असावा तर असा – कर्तव्य हेच ज्याचे देव!”

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!