गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे यांची सारोळा शाळेस भेट, विद्यार्थी गुणवत्तेबाबत समाधान
तालुक्याचे नूतन गटशिक्षणाधिकारी आदरणीय धनंजय बोंदार्डे साहेब तसेच प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजना जामखेड तालुका डेटा एन्ट्री ऑपरेटर बाळू गोरे यांनी सारोळा प्रशालेस सदिच्छा भेट दिली.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सारोळा शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी बोंदार्डे साहेब यांनी सारोळा शाळेतील इयत्ता 1ली ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची भाषा व इंग्रजी वाचन लेखन तसेच गणित संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया, मिशन आरंभ -शिष्यवृत्ती याविषयक तपासणी केली.आवश्यक त्या ठिकाणी विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थी गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.तसेच शालेय परिसर,भौतिक सुविधा व शाळेतील विविध उपक्रम याबाबत आढावा घेऊन एकंदरीत शालेय प्रगतीबद्दल संपूर्ण सारोळा टीमचे साहेबांनी कौतुक केले.
तसेच शापोआ डेटा एन्ट्री ऑपरेटर बाळू गोरे यांच्या समवेत साहेबांनी सारोळा शाळेतील किचनशेड,तांदूळ व धान्यादी माल,मेनूनुसार आहार,भाजीपाला व पुरक आहार, शा.पो.आ.रेकॉर्ड,साठवण व स्वच्छता याबाबत तपासणी करून समाधान व्यक्त केले.
या भेटीच्या प्रसंगी जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी आदरणीय धनंजय बोंदार्ड साहेब, शापोआ डेटा एन्ट्री ऑपरेटर बाळू गोरे ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, पालक संभाजी सातपुते, दादासाहेब सातपुते,घोडेगाव शाळेचे मुख्याध्यापक साबळे सर,सारोळा शाळेचे मुख्याध्यापक संदिप भालसिंग सर,
पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे ,राहुल लिमकर , उपाध्यापक प्रशांत होळकर ,उपाध्यापिका शबाना शेख मॅडम,वृषाली खांदवे व अमृता रसाळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते…!