Thursday, June 18, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड दुध भेसळ प्रकरण : फरार ९ आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची...

जामखेड दुध भेसळ प्रकरण : फरार ९ आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई “वेगवेगळ्या ठिकाणांवरून मुसक्या आवळल्या; एकूण आरोपींची संख्या ४१ वर”

0
2

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड दुध भेसळ प्रकरण : फरार ९ आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

“वेगवेगळ्या ठिकाणांवरून मुसक्या आवळल्या; एकूण आरोपींची संख्या ४१ वर”

 

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आलेल्या दुध भेसळ प्रकरणातील फरार ९ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले आहे. या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
फक्राबाद, ता. जामखेड येथे दुधात रसायने व पावडर मिसळून बनावट दुध तयार करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला होता. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, ३३८, ३(५) व अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६(१), २६(२)(i), ५७, ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरुवातीला ३ आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान रसायने पुरवठा करणारे, पावडर विकणारे व बनावट दुध तयार करणारे इतर ३८ जण निष्पन्न झाल्याने एकूण आरोपींची संख्या ४१ झाली होती. यापैकी ७ जणांना यापूर्वीच अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

९ फरार आरोपींना अटक
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि/हरिष भोये, समीर अभंग व पथकाने श्रीरामपूर, राहुरी, अहिल्यानगर, पारनेर, जामखेड येथे शोधमोहीम राबवली.

तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून खालील ७ आरोपींना ताब्यात घेतले १. हरिदास एकनाथ गोपाळघरे (वय ३४, रा. नागोबाची वाडी, जामखेड)

२. सद्दाम कमरुद्दीन शेख (वय २९, रा. उंबरे, ता. राहुरी)
३. चंद्रकांत आण्णा बर्डे (वय ३६, रा. उंबरे, ता. राहुरी)
४. महेश तुकाराम मोकाटे (वय २५, रा. इमामपूर)
५. लक्ष्मण पोपट करंजुले (वय ३१, रा. पाडळी रांजणगांव, ता. पारनेर)
६. किशोर काशिनाथ पुंड (वय ४६, रा. भोकर, ता. श्रीरामपूर)
७. सर्जेराव मोहन म्हसे (वय ४५, रा. शिलेगांव, ता. राहुरी)

तसेच दि. १८ जून २०२६ रोजी आणखी दोघांना अटक करण्यात आली :
८. सतिष भाऊसाहेब पठारे (वय ३६, रा. विदळघाट, अहिल्यानगर)
९. संजय सुंदरराव गुंड (वय ३८, रा. वाघळुज, ता. आष्टी, जि. बीड)

न्यायालयात हजर, पोलीस कोठडी
ताब्यातील ७ आरोपींना दि. १७ जून २०२६ रोजी अटक करून जामखेड येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने दि. २४ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. उर्वरित २ आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पुढील तपास सुरू
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दुध भेसळीसारख्या गंभीर प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!