सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारींचा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सत्कार

0
200
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन पदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल येथील ग्रामीण रुग्णालय स्टाफच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 स्थानकवासी जैन समाज ची मातृ संस्था ऑल इंडिया श्र्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स दिल्ली च्या राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूक २०२१-२०२३ या वर्षासाठी मध्ये महाराष्ट्र राज्यातून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल येथील ग्रामीण रूग्णालय स्टाॅफच्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी बोलताना ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाॅ.संजय वाघ म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते कोठारी हे नेहमीच आमच्या हॉस्पिटल ला मदत करत असतात.  पंधरा वर्षांपूर्वी मी स्वतः येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. तेव्हा त्यांनी माझ्यासह सर्वच स्टाॅफला मदत करतानाच रूग्णालयाच्या सबंधीत अडचणीला धावून आलेले आहेत.  त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून  आम्ही सर्व स्टाफ त्यांचा छोटासा सन्मान करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
      यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.शशांक शिंदे, कनिष्ठ लिपिक अरविंद राठोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्याम जाधवर, औषध निर्माण अधिकारी प्रवीण मंडलेचा, समुपदेशक राजेश मिश्रा आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here