खंडणी न दिल्यामुळे धक्काबुक्की करून जनावरांची चोरी, जामखेड तालुक्यातील घटना
खर्डा पोलीस स्टेशनला तीघांविरोधात गुन्हा दाखल
खंडणी न दिल्यामुळे घरी वडीलांना धक्काबुक्की करून दोन बैल, एक शेळी, दोन बोकड, एक लाकडी बैलगाडी आमची संमती नसताना चौरी करण्याच्या उद्देशाने घेऊन गेले तीन आरोपीविरुध्द खर्डा पोलीस स्टेशनला बळजबरीने वसुली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० मे २०२६ रोजी एक लाख रुपये खंडणी दे नाहीतर तुला जीवे मारील अशी धमकी बाबू गव्हाणे यांने दिली होती तेव्हा मी भीतीपोटी देतो म्हणून सांगितले होते. मी २१ मे रोजी गावाला गेलेलो असताना आरोपी 1) बाबु मधुकर गव्हाणे रा. पिंपळगाव उंडा, 2)नेताजी भागवत पवार 3)तात्या भागवत पवार दोघे रा. दौंडाचीवाडी ता. जामखेड यांनी वडिलांना धमकी तसेच धक्काबुक्की करून दोन बैल, एक बैलगाडी, एक शेळी, दोन बोकड आमची संमती नसताना चोरी करण्याच्या उद्देशाने घेऊन गेले तशी फिर्याद दि. २७ रोजी खर्डा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
खर्डा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी भैरवनाथ रेवणनाथ ढगे वय 36 वर्षे धंदा- शेती रा. पिंपळगाव उंडा ता जामखेड जि अहिल्यानगर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी समक्षपोलीस स्टेशनला हजर होवुन र्फियाद देतो की, मी वरील ठिकाणी राहत असुन घरामध्ये वडील रेवणनाथ, आई लोचना, पत्नी पुजा असे एकत्र राहतो शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरर्निवाह करतो.
मी नेताजी भागवत पवार रा.दौंडाचीवाडी यास माझे शेतातील विहिर खोदण्यास दिली होती. ठरल्याप्रमाणे खोदकाम नाही केले तरीही मी संपुर्ण पैसे दिले. दिनाक 08/05/2026 रोजी पिंपळगाव उंडा स्मशान भुमी जवळ माझ्या गावातील बाबु मधुकर गव्हाणे रा. पिंपळगाव उंडा व नेताजी भागवत पवार यांना हाताशी धरुन मला हाणमार व शिविगाळ करुन बाबु गव्हाणे म्हणाला तुला जर दौंडाचीवाडी येथुन खंडेश्वरवाडीला जायचे असेल तर तुला दिनाक 20/05/2026 रोजी 1 लाखरुपये खंडणी मला द्यावी लागेल, नाही दिली तर तुला जिवे मारीन अशी धमकी दिली.
भिती पोटी मी त्यांना हो म्हणालो व तेथुन निघुन गेलो.खंडणी न दिल्यामुळे दिनाक 21/05/2026 रोजी सकाळी 10/00 वा. चे सुमारास माझे पांढऱ्या रंगाचेदोन बैल, एक काळ्या रंगाची शेळी व दोन बोकड असे आमच्या घरी पिंपळगाव उंडा ता. जामखेड येथील घरासमोर बांधुन मी माझ्या सासरवाडी रत्नापुर येथे गेलो असता मला सकाळी 10/30 वा. चे सुमारास आमचे गावातील नामदेव गव्हाणे याने फोनकरुन सांगितले की तुझे बैल, शेळी व बोकड आरोपी
1) बाबु मधुकर गव्हाणे रा. पिंपळगाव उंडा, 2)नेताजी भागवत पवार 3)तात्या भागवत पवार दोघे रा. दौंडाचीवाडी ता. जामखेड हे घेवुन गेले आहेत असे सांगितले असता मी माझ्या घरी पिंपळगाव उंडा येथे येत असताना रस्त्यात दौंडाचीवाडी येथे आलो असता मला तात्या भागवत पवार रा.दौंडाचीवाडी हा माझे दोन बैल गाडीला जुपुन व बैलगाडीला पाठीमागे शेळी व दोन बोकड बांधुन चाललेला दिसला.
मी माझ्या घरी आलो असता माझे दोन बैल, एक शेळी, दोन बोकड व बैलगाडी असे दिसुन आले नाही. तेव्हा माझ्या वयस्कर वडिलानी सांगीतले कि, 1) बाबु मधुकर गव्हाणे रा. पिंपळगाव उंडा, 2) नेताजी भागवत पवार 3)तात्या भागवत पवार असे तीघे आले व तुझ्या मुलाने माझे पैसे दिले नाही असे म्हणुन मला धक्का बुक्की शिविगाळ करुन आपले दोन बैल, बैलगाडी, शेळी व दोन बोकड हे घेवुन गेले आहेत.
तेव्हामाझी खात्री पटली की माझे दोन बैल, बैलगाडी, शेळी व दोन बोकड 1) बाबु मधुकर गव्हाणे रा. पिंपळगाव उंडा, 2)नेताजी भागवत पवार 3) तात्या भागवत पवार याने माझी संमती नसताना चोरीकरुन घेवुन गेले आहेत. व गाडी नंबर MH06 AG 4544 या गाडीत बैले खाटकाला विकलेले पोच करायला चालले होते. त्या पिक अप मध्ये ड्रायवर वाघ ( पुर्ण नाव माहित नाही) व नेताजी पवार दोघे रा. दौंडाचीवाडी हे होते.
चोरीस गेलेल्या जनावराचे वर्णन
खालीलप्रमाणे. 1)50,000/- दोन बैल पाढऱ्या रंगाचे वय अंदाजे सात वर्ष वयाचे किं.अं.2)7,000/- रु. किं.चे एक काळ्या रंगाची शेळी वय अंदाजे पाच वर्ष वयाची किं.अं.3)10,000/-रु. किं.चे दोन काळ्या रंगाचे बोकड वय अंदाजे सहा महिने वयाचे किं.अं.4)10,000/-रु.किं.ची. लाकडी बैल गाडी जु.वा. किं.अं.77,000/- एकुण रूपये वरील तीन आरोपींनी चोरून नेला अशी फिर्याद खर्डा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. वरील घटनेचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गोकुळ इंगोले करत आहेत.