Thursday, May 28, 2026
Home राजकारण जामखेड च्या नेत्यांचे राज्यात वजन मात्र जामखेड मूलभूत समस्येच्या गर्तेत राजकीय...

जामखेड च्या नेत्यांचे राज्यात वजन मात्र जामखेड मूलभूत समस्येच्या गर्तेत राजकीय जोडे बाजूला ठेवून जामखेडच्या विकासासाठी एकत्र यावे – जामखेडकर

0
2

जामखेड न्युज – – – – – – – 

जामखेड च्या नेत्यांचे राज्यात वजन मात्र जामखेड मूलभूत समस्येच्या गर्तेत

राजकीय जोडे बाजूला ठेवून जामखेडच्या विकासासाठी एकत्र यावे – जामखेडकर

प्रा. राम शिंदे, रोहित पवार यांचे राज्यात वजन, आता परत सुनील कर्जतकर यांच्या रूपाने तिसरा आमदार मिळाला आहे पण जामखेडकरांना मूलभूत अशा पाणी, वीज रस्त्यांची अडचण कायम आहे. बेरोजगाराचा प्रश्न आहे मोठे नेते, मंत्रिपदाचा अनुभव, आता सभापती पद, तरी तालुक्यात मूलभूत सुविधांसाठी जनतेला झगडावे लागत आहे. ही खरी शोकांतिका आहे.

 

जामखेड-कर्जत मतदारसंघ. राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत. एका बाजूला विधानपरिषदेचे सभापती माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. राम शिंदे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, आमदार रोहित पवार. दोघांचेही मंत्रालयात वजन, मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट संपर्क. पण जामखेड शहर व 87 गावांत फिरलं की प्रश्न पडतो हे वजन जामखेडच्या पाणी, वीज, रस्त्यासाठी का वापरले जात नाही?

प्रा. राम शिंदे माजी कॅबिनेट मंत्री, विधान परिषद सभापती, पक्षाचे धोरण ठरवणाऱ्या कोअर टीममध्ये. तर रोहित पवार विद्यमान आमदार, उद्योगपती, युवकांचे आयकॉन, बारामतीकर पवार घराण्याचे वारसदार तरीही जामखेड शहराला दहा ते बारा दिवसाआड पाणी तर खेड्यातील परिस्थिती खुपच भयानक आहे महिना महिना पाणी नाही जलजीवन मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून केलेल्या पाईपलाईन कोरड्या ठक्क मग प्रश्न पडतो जलजीवन जनतेसाठी कि ठेकेदार कार्यकर्ते यांच्या साठी भयानक परिस्थिती आहे.

2019 च्या निवडणुक प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड शहरासाठी उजणी पाणीपुरवठा योजना मंजूर पत्र दाखवले सात वर्षे झाले अद्याप पन्नास टक्के काम पूर्ण नाही तसेच रोहित पवार यांनी आपणच योजना आणली म्हणून सांगितले पण अद्याप पाणी नाही. तसेच वीज व रस्त्याची परिस्थिती खुपच भयानक आहे.

सध्या 42 अंशाच्या उन्हात दिवसाला 10 वेळा लाईट जाते. शेतीला रात्री-अपरात्री वीज. दोघांचेही दिल्ली-मुंबईत थेट संबंध, निधी आणण्याची क्षमता. तरीही मुलभूत समस्या सुटेनात.

राज्यातील सर्व ठिकाणचे अतिक्रमणे निघतात पण जामखेड चे निघत नाही फक्त गोरगरिबांच्या टपऱ्या काढल्या दिखावा केला मोठ्यांचे अतिक्रमणे तशीच आहेत. तिन वर्षापासून रस्ता धूळ खात पडून आहे जनतेला धुळीचा व वाहतूक कोंडी चा सामना करावा लागत आहे. जामखेड तालुक्यातील रस्त्याला खड्ड्यांचे साम्राज्य आहे ST बस आदळआपट करत चालतात.

मतदारसंघातील बेरोजगार युवकांना काम मिळावे म्हणून एमआयडीसी गरजेची पण अडवाअडवीच्या राजकारणात एमआयडीसी पण नाही ना रोहित पवार यांची ना सभापती प्रा राम शिंदे यांची.

जनता काय विचारते?
“राम शिंदे साहेब मंत्री होते तेव्हा वाटलं आता जामखेडचे दिवस बदलतील. रोहित दादा आमदार झाले, वाटलं तरुण नेता, नवीन दम. पण पाणी-लाईटचा प्रश्न आजही तसाच. निवडणुकीत दोघे येतात, आश्वासन देतात, जातात, एक सामान्य जामखेड कर

सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार “साहेबांचे भाषण ऐकलं की वाटतं आता विकासाची गंगा येईल. पण आम्हाला तर हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. दवाखान्यात सलाईन लावायला लाईट नसते.”

प्रा. राम शिंदे यांची बाजू
“मी मंत्री असताना जामखेड MIDC मंजूर केली, उजनी पाणी योजना आणली, 132 केव्ही सबस्टेशनचा प्रस्ताव दिला. पण पुढच्या सरकारने निधी दिला नाही. विरोधक फक्त श्रेय घेतात. मी आजही पाठपुरावा करतोय.

आ. रोहित पवार यांची भूमिका
“मी निवडून आल्यापासून रस्त्यांसाठी 180 कोटी, पाणी योजनांसाठी 90 कोटी मंजूर केले. कामे सुरू आहेत. वीजप्रश्नावर ऊर्जामंत्र्यांकडे 3 वेळा बैठक घेतली. यंत्रणा हलत नाही, त्याला मी काय करू? पण जामखेडकरांना शब्द देतो, 2027 पर्यंत पाणी-वीज प्रश्न 100% सुटेल,” आ. पवार यांनी स्पष्ट केले.

वस्तुस्थिती काय सांगते?
1. पाणी : उजनी जामखेड उपसा जलसिंचन योजना 2014 ला मंजूर. 2026 उजाडले तरी अनेक गावे अजून जोडली नाहीत. शहराची जुनी योजना 50 वर्षांपूर्वीची.

2. वीज: 33/11 केव्ही उपकेंद्र ओव्हरलोड. 132 केव्हीची मागणी 8 वर्षांपासून. उन्हाळ्यात मागणी 40% वाढते, पण क्षमता तीच.

3. रस्ते: जामखेड-बीड महामार्गाचे काम 3 वर्षे रखडले. PMGSY चे ग्रामीण रस्ते कागदावर पूर्ण, प्रत्यक्षात खड्डे.

राजकीय श्रेयवादाचा फटका
दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सांगतात, “आमच्या साहेबांनी निधी आणला”. पण जमिनीवर काम दिसत नाही. फाईल मंत्रालयात, अधिकारी उदासीन, कंत्राटदार संथ. श्रेयवादात जामखेडकर भरडले जातात.

जामखेड कर म्हणतात, “दोघेही मोठे नेते. एकाने पाणी आणावे, दुसऱ्याने वीज. भांडण नको. जामखेडच्या लेकाराबाळांचा विचार करा. नाहीतर 2029 ला जनता विचारल्याशिवाय राहणार नाही.”

राज्यात वजन असलेले नेते असून उपयोग काय, जर मतदारसंघात नळाला पाणी नाही, घरात लाईट नाही, दारात रस्ता नाही? प्रा. राम शिंदे व रोहित पवार यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून ‘जामखेड मिशन विकासमोड’वर एकत्र यावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे. कारण शेवटी विकासाला पक्ष नसतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!