Monday, July 13, 2026
Home ताज्या बातम्या महाराष्ट्राचा मान आशियाई स्तरावर! AVC Cup 2026 मध्ये भारताला कांस्य; जामखेडच्या ओम...

महाराष्ट्राचा मान आशियाई स्तरावर! AVC Cup 2026 मध्ये भारताला कांस्य; जामखेडच्या ओम लाडची ऐतिहासिक कामगिरी

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

महाराष्ट्राचा मान आशियाई स्तरावर!

AVC Cup 2026 मध्ये भारताला कांस्य; जामखेडच्या ओम लाडची ऐतिहासिक कामगिरी

भारताच्या वरिष्ठ पुरुष व्हॉलीबॉल संघात खेळताना जामखेडचे सुपुत्र ओम लाड यांनी दमदार कामगिरी करत भारताला AVC Cup 2026 मध्ये कांस्यपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

या यशासोबतच ओम लाड यांच्या नावावर एक ऐतिहासिक विक्रम नोंदला गेला आहे. वरिष्ठ गटातील आशियाई स्तरावरील स्पर्धेत पदक जिंकणारे ओम लाड हे महाराष्ट्रातील पहिलेच व्हॉलीबॉलपटू ठरले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ओम लाड यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचा जामखेड येथे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा. रमेश दादा आजबे, राजुरीचे विद्यमान सरपंच सागर (भाऊ) कोल्हे, डॉ. कैलास हजारे, अण्णा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ओम लाड यांच्या यशाची प्रेरणा:
1. गाव ते आशिया – जामखेड सारख्या छोट्या गावातून आशियाई पदकापर्यंतचा प्रवास म्हणजे मेहनतीचे उदाहरण
2. पहिला विक्रम- महाराष्ट्रासाठी हे पहिलेच आशियाई पदक
3. तरुणांसाठी आदर्श- “आपणही करू शकतो” हा विश्वास त्यांनी दिला. 

महाराष्ट्र आणि जामखेडसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. ओम लाड यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!