Sunday, July 12, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड पोलीस स्टेशन परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने वृक्षारोपण करत दिला पर्यावरण...

जामखेड पोलीस स्टेशन परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने वृक्षारोपण करत दिला पर्यावरण संदेश

0
2

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड पोलीस स्टेशन परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने वृक्षारोपण करत दिला पर्यावरण संदेश

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आज जामखेड शहरातील पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात प्रतिष्ठानचे सदस्य, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींनी विविध प्रकारच्या 63 झाडांची लागवड करून परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला.

या अभियानाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांनी झाडे लावण्यासोबतच त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात एकूण 45 सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

सेवाभावी कार्याची परंपरा
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान गेली अनेक दशके समाजप्रबोधनासोबत विविध सेवाभावी उपक्रम राबवत आहे. वृक्षलागवड, रक्तदान, जलसंधारण, शैक्षणिक मदत आणि आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे प्रतिष्ठान सातत्याने समाजसेवा करत आहे.

त्याच सेवाकार्याचा एक भाग म्हणून जामखेडमध्ये हे वृक्षारोपण अभियान घेण्यात आले.

पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!