42 अंशाच्या उन्हात दिवसातून व रात्रीतून अनेक वेळा वीज गायब, रात्रीची झोप उडाली
जामखेडमध्ये सध्या एकच घोषणा सुरू आहे – “बत्ती गुल, गर्मी फुल!” मे महिन्याचा कडाका आणि त्यात महावितरणचा लपंडाव यामुळे शहर व तालुक्यातील गावे अक्षरशः होरपळून निघाली आहेत.
काय आहे अवस्था?
– तापमान ४२ अंश. अंगाची लाहीलाही होतेय. वीज दिवसातून 8 ते 10 वेळा गुल. प्रत्येक वेळी 15-20 मिनिटे ते 1 तास गायब. रात्री पाच दहा वेळा वीज नसतेच. पंखे बंद, कुलर बंद होतात , इन्व्हर्टरही हात टेकतात नागरिक उकाडय़ामुळे हैराण होत आहेत.
पाणी विजेअभावी नगरपरिषदेचे पाणी दहा दिवसांतून एकदा सुटते आणि नेमकी लाईट जाते यामुळे नळाला पाणी मिळत नाही.
जनता काय म्हणते? “दिवसभर घामाच्या धारा, रात्री डासांचे थवे. लेकरं रडतात, म्हातारी माणसं घुसमटतात. सरकार फक्त सत्कार करतंय, पण आम्हाला 24 तास वीज देऊ शकत नाही,” सामान्य नागरिक
व्यापारी म्हणाले, “फ्रीज बंद पडल्याने दूध, आईस्क्रीम खराब. दुकानात ग्राहक येत नाही. 24 तासाचे वीजबिल भरतो, पण वीज मिळते 14 तासच.”
महावितरणचे उत्तर
तेहतीस के व्ही सप्लाय आष्टी वरून ट्रीप झालेला आहे लाईट येण्यास पंधरा ते वीस मिनिटे कधी अर्धा तास लागेल ट्रान्सफॉर्मर फाॅल्ट, “मागणी 40% वाढली. जामखेड सबस्टेशन ओव्हरलोड. बीड लाईनवर काम सुरू आहे. 8 दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून प्रश्न सुटेल,” महावितरण चे उत्तर
हवामान खात्याचा अंदाज – पुढील आठवड्यात पारा 42 ते 44 अंशावर जाईल. वीज सुरळीत न झाल्यास उष्माघाताचे बळी वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली.
“बत्ती आली की जीवात जीव येतो, गेली की घामाच्या धारा!” – अशीच अवस्था सध्या जामखेड करांची झाली आहे.