Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये एन.एस.डि.एल. कार्डसाठी एजंट मार्फत जेष्ठ नागरीकांची लूट २०० रूपयांपेक्षा जास्त...

जामखेडमध्ये एन.एस.डि.एल. कार्डसाठी एजंट मार्फत जेष्ठ नागरीकांची लूट २०० रूपयांपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत – रामचंद्र इंगळे

0
3

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये एन.एस.डि.एल. कार्डसाठी एजंट मार्फत जेष्ठ नागरीकांची लूट

२०० रूपयांपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत – रामचंद्र इंगळे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC/ST) बस प्रवासात सवलत मिळवण्यासाठी एन.एस.डि.एल. कार्ड दिले जात आहे या नवीन कार्डसाठी ₹१९९ दर निश्चित करण्यात आला आहे. हे काम महामंडळाने एजन्सी ला दिले आहे एजन्सीने कार्ड वितरण करण्यासाठी
एजंट नेमले आहेत मात्र एजंट मनमानी रक्कम घेऊन महिला, ज्येष्ठ नागरिक यांची लूट करत आहेत याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात लूट करणाऱ्या एजंट वर कारवाई करावी अशी मागणी रामचंद्र इंगळे यांनी केली आहे.

रामचंद्र मारूती इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, एन.एस.डि.एल. कार्ड काढणेसाठी दि. १९/०३/२०२६ रोजी बस स्टॅन्डमध्ये गेलो होतो. त्यादिवशी एजंट महेश दत्तात्रय बहिर यांनी माझ्या कडून रोख दोनशे रूपये (रू.२००/-) घेतले.

त्यानंतर दि. १६/०५/२०२६रोजी बस स्टँड मधील एजंसीकडे गेलो होतो. एन.एस.डि.एल. कार्ड मागीतले असता महेश बहिर यांनी जादा पैशाची मागणी केली. ती म्हणजे रू.५०/- मागीतले तसेच रू.५०/- दिल्याशिवाय कार्ड मिळत नाही.

नाविलाजास्तव म्हणून मला ५०/- रूपये देणे भाग पडले. परंतू ही ज्येष्ठ नागरीकांची आर्थिक लुट आहे. एजंट बहिर महेश यास ५०/- रूपयाची रितसर पावती मागीतली असता त्यानी पावती देण्यास नकार दिलाव कोठे तक्रार करायची तेथे तक्रार करा. माझे कोणी काही करू शकत नाही. असेअरेरावीची भाषा वापरली.

तसेच सर्व एस.टी. कार्ड ग्राहकाकडून हा एजंट असेच ५०/-रू जादा घेत आहे.तरी साहेबांनी सदर एजंटवर कायदेशीर कारवाई करून शासन करावे व परवाना रद्द करण्यात यावा. तसेच कारवाई न झाल्यास जामखेड ग्राहक पंचायत आंदोलन करेन वेळ पडल्यास उपोषण अथवा धरणे आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

याबाबत जामखेडचे आगार प्रमुख प्रमोद जगताप यांच्याशी  संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्या कडे लेखी तक्रार आली आहे तो अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे ते योग्य निर्णय घेतील 

चौकट
एन.एस.डि.एल. नवीन कार्डसाठी ₹१९९ दर निश्चित करण्यात आला आहे. तेवढेच पैसे द्यावेत कोणीही २०० रूपयांपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत कोणी जास्त पैसे मागत असेल तर तक्रार करावी असे आवाहन ग्राहक पंचायतचे रामचंद्र इंगळे यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!