जामखेडमध्ये ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’चा भव्य उद्घाटन सोहळा उद्या
जामखेड शहरातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्रतपासणी व नेत्ररोग उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’ या नव्या नेत्ररुग्णालयाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे शुभहस्ते मा. श्री. श्रीकांत होशिंग (माजी प्राचार्य, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड) यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. बाळासाहेब पारखे, मा. जानमोहम्मद पठाण, मा. मुमताज पठाण, मा. अझरभाई काझी तसेच मा. श्री. नरेंद्र डहाळे उपस्थित राहणार आहेत.
या क्लिनिकचे प्रमुख नेत्रतज्ज्ञ डॉ. मिसबाह फारूक शेख (MBBS, MS Ophthalmology, FAEH – Glaucoma, अरविंद आय हॉस्पिटल, कोईबतूर) हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नेत्ररोगांचे निदान व उपचार करणार आहेत. त्यांना डॉ. फारूक शेख (BAMS) आणि डॉ. सादेख पठाण (BAMS) यांचे सहकार्य लाभणार आहे.
‘दृष्टी स्पष्ट… जीवन समृद्ध…’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू होणाऱ्या या क्लिनिकमध्ये डोळ्यांची सर्व प्रकारची तपासणी, चष्म्याचा नंबर, काचबिंदू (Glaucoma), मोतीबिंदू, मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे आजार तसेच इतर नेत्रविकारांवर तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचार उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
व्हिजन प्लस आय क्लिनिक हे अलहरम हॉस्पिटल, सदाफुले वस्ती, जामखेड येथे सुरू होत असून, उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.