जामखेड न्युज – – – – –
पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात; जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
अहिल्यानगर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केलेल्या सोयाबीन, कापूस, तूर तसेच इतर खरीप पिकांना ओलाव्याअभावी फटका बसत असून अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
जामखेड परिसरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.त्यामुळे उगवलेली पिके सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतेत आहेत. सततच्या बदलत्या हवामानामुळे खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







