जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
नाशिक येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयातील कोमल तुकाराम उदमले या कृषी कन्येने पुढाकार घेत परिसरात वृक्षारोपण करत ग्रामस्थांना
पर्यावरण संवर्धनासाठी झाडांचे महत्त्व सांगितले.
चोंडी ता. जामखेड येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमातंर्गत नुकतेच नाशिक येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयातील कोमल उदमले या कृषी कन्येच्या वतीने गावात वृक्षारोपण करण्यात आले ग्रामस्थांना झाडांचे महत्व सांगितले यावेळी गावचे सरपंच सुनिल उबाळे, ग्रामपंचायत सदस्य कल्याण शिंदे, बापू उदमले, दत्ता शिंदे, हनुमंत उदमले, संदिप सोनवणे, कविता उदमले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी कन्या कोमल उदमले हिने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिश हाडोळे, सहाय्यक प्राध्यापक व कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. सुनिल बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व शेतकर्यांना वृक्षारोपण, बीजप्रक्रीया, रोगव्यवस्थापन, मुरघास, माती परीक्षण याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सुनिल उबाळे यांनी कृषी कन्या कोमल उदमले हिचे कौतुक केले.