अमोल राळेभात यांची ‘कन्या विद्यालय’ स्कूल कमिटी सदस्यपदी निवड,
रयत शिक्षण संस्थेकडून अधिकृत पत्राद्वारे सन्मान
शिक्षण क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी नामांकित संस्था असलेल्या ‘रयत शिक्षण संस्थेच्या’ उत्तर विभाग, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या कन्या विद्यालय, जामखेड येथील स्कूल कमिटी सदस्य म्हणून जामखेडचे सुपुत्र व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांची निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने नुकतेच त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक
आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांची ही निवड दि. ०१/०४/२०२६ ते ३१/०३/२०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
अमोल राळेभात यांच्या या निवडीमुळे जामखेड तालुक्यासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
“गुणात्मक विकासासाठी बहुमोल योगदान लाभेल” – रयत शिक्षण संस्था
रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी अमोल राळेभात यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, नियुक्ती पत्राद्वारे विश्वास व्यक्त केला की, “त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वगुणांचा लाभ कन्या विद्यालय, जामखेड या शाखेच्या सर्वांगीण आणि गुणात्मक विकासासाठी निश्चितपणे होईल.”
शिक्षणासोबत सामाजिक कार्यात अग्रेसर
अमोल राळेभात हे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असून, सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या स्कूल कमिटी सदस्यपदी निवडीमुळे कन्या विद्यालयाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
—
“कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कन्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनी घडावी, हेच माझे ध्येय राहील” – अमोल राळेभात