Monday, April 20, 2026
Home राजकारण विद्या मोटेना विधान परिषदेवर संधी द्यावी; यासाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने चौंडी...

विद्या मोटेना विधान परिषदेवर संधी द्यावी; यासाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने चौंडी येथे दुग्ध अभिषेक

0
2

जामखेड न्युज—–

विद्या मोटेना विधान परिषदेवर संधी द्यावी; यासाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने चौंडी येथे दुग्ध अभिषेक

 

शिवसेना नेत्या व अहिल्याकन्या ॲड. विद्याताई मोटे यांची शिवसेना पक्षाने विधान परिषदेवर संधी द्यावी यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव चौंडी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर बांधवांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करुन शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंतीचे औचित्य साधत अहिल्याकन्या विद्याताई मोटे यांना शिंदे गटाकडुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षाने विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी समस्त धनगर समाज बांधव अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव आसलेल्या चौंडी येथे सोमवार दि २० एप्रिल २०२६ रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करुन करण्यात आली.

यावेळी महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, विद्याताई मोटे यांच्या मागिल कार्यकाळात जे मोठे समाजकार्य करण्यात आले त्याची दखल घेत धनगर समाज बांधव त्यांच्या पाठीशी उभा आहे.

शिवसेना उपमुख्यमंत्री राज्य एकनाथ शिंदे यांनी अहिल्याकन्या विद्याताई मोटे यांना विधान परिषदेवर संधी देऊन समस्त धनगर बांधवांच्या मनावरती राज्य करावे. तसेच शिवसेनेच्या कोट्यातून उच्चशिक्षित विद्याताई मोटे विधानपरिषद गेल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या वतीने चोंडी येथे ३१ मे रोजी येतोचित भावी दिव्य अशा सत्कार करण्यात येईल.

पहिली महिला धनगर समाजातील विधान परिषदेवरती जाणे हा महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांसाठी आनंदाचा क्षण असेल. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंतीचे औचित्य साधत एकनाथ शिंदे हे उच्च शिक्षित धनगर समाजाच्या महिलेला विधान परिषदेवरती नक्कीच संधी देतील आणि आमच्या अहिल्या चरणी नतमस्तक होऊन केलेल्या मागणीला नक्कीच यश द्याल असे देखील पांडुरंग माने यांनी सांगितले. चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करण्यात आला यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

संभाव्य उमेदवारांच्या यादीत विद्याताई मोटे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा

विद्याताई मोटे या गेल्या काही वर्षात सामाजिक व राजकीय पातळीवर सक्रिय राहिल्या आहेत, विशेषतः धनगर समाजातील प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कामामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी तळागाळाशी थेट संपर्क आणि संघटन कौशल्यामुळे शिवसेनेतील एक प्रभावी महिला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच विधानपरिषदेच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव आधाडीवर असल्याचे बोलले जात आहे. आणि याच आनुशंगाने विद्या मोटे यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने चौंडी येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करुन मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!