कर्जत-जामखेडसाठी आ.रोहित पवारांनी आणली अद्ययावत कॅथ लॅब _जामखेडच्या आरोळे हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली होणार सर्व तपासण्या

0
246
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
          राष्ट्रवादीचे युवा नेते आ.रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडच्या नागरिकांसाठी आरोग्यक्रांती घडवुन आणली आहे. त्यांच्या प्रयत्नाने आता जामखेडच्या आरोळे हॉस्पिटलमध्ये अद्ययावत कॅथलॅब रुग्णांच्या सेवेत  अल्पदरात सुरू झाली आहे. या कॅथलॅबचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, आ. रोहित पवार,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे,क्रस्ना डायग्नोस्टिकचे आदर्श कर्णावट,डॉ. रवी आरोळे,डॉ.शोभा आरोळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच पार पडले.
                       ADVERTISEMENT
     आ.रोहित पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे येथील नामांकित व संपुर्ण महाराष्ट्रभर कोव्हिडसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या ‘क्रस्ना डायग्नोस्टिक’ कंपनीने कॅथ लॅब उपलब्ध करून दिली आहे. सध्या या लॅबमध्ये कोव्हिड चाचणी,ब्लड शुगर चाचणी,पोस्ट कोव्हिड चाचणी,डी-डायमर, एल.एफ.टी, लिपिड प्रोफाइल, हिमोग्राम,बोन डेन्सीटी व इतर अशा जवळपास १५० हुन अधिक प्रकारच्या चाचण्या या कॅथलॅब मध्ये करण्याची सोय आहे. रेडिओलॉजी, डायग्नोस्टिक,अल्ट्रासाउंड,एक्स रे,सिटी स्कॅन या सुविधादेखील त्यामध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत.या पॅथॉलॉजीमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या हेमाटोलॉजी,बायोकेमिस्ट्री व सुपर स्पेशालिटी तपासण्यांमध्ये बाजार दरापेक्षा ४० टक्के सुट देण्यात येणार आहे. मतदारसंघाच्या आरोग्य यंत्रणेत ज्या उकरणांची कमतरता भासेल ती उपकरणे उपलब्ध करण्यासाठी आ.पवारांची कायम आग्रही भुमिका राहिली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शब्दाला आणि आवाहनाला मोठी मदत मिळते हे सर्वसृत आहे.पुणे, मुंबईसारख्या शहरी भागात ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा आता इथे माफक दरात रुग्णांना मिळणार आहेत.मतदारसंघातील ही पहिलीच मोठी कॅथ लॅब आहे.अत्यावश्यक चाचण्यांच्या तपासणीसाठी नगर, पुणे, बारामती अशा शहरी भागात जावे लागत होते मात्र यापुढे सर्व चाचण्या याच ठिकाणी आणि तात्काळ होणार असुन रुग्णांचा अधिकचा पैसा व वेळ वाचणार आहे.त्यामुळे कर्जत जामखेडच्या रुग्णांसाठी आ.पवार यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही सुविधा महत्वपुर्ण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here