Friday, April 10, 2026
Home ताज्या बातम्या संत समर्थ दादा गुरू महाराज यांचे जामखेड शहरात आगमन, श्री शांतीनाथ सेवा...

संत समर्थ दादा गुरू महाराज यांचे जामखेड शहरात आगमन, श्री शांतीनाथ सेवा आश्रमाच्या संकल्पित मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण नगराध्यक्षा व नगरसेवकांच्या वतीने स्वागत

0
3

जामखेड न्युज—–

संत समर्थ दादा गुरू महाराज यांचे जामखेड शहरात आगमन, श्री शांतीनाथ सेवा आश्रमाच्या संकल्पित मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण

नगराध्यक्षा व नगरसेवकांच्या वतीने स्वागत

अखंड निराहारी अवधूत सिद्ध महायोगी श्री दादागुरु महाराज यांचे जामखेड येथे आगमन झाले असता प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई अमितभाऊ चिंतामणी सर्व नगरसेवक व पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेल्या श्री शांतीनाथ सेवा आश्रमाच्या संकल्पित मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण दादा गुरु महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

संत समर्थ दादा गुरू महाराज हे मध्यप्रदेशातील एक थोर आध्यात्मिक व्यक्तिमत्व असून, ते गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ ‘निराहार’ (अन्न न घेता) राहून, केवळ नर्मदा जल ग्रहण करून नर्मदा परिक्रमा आणि नर्मदा संवर्धनासाठी कार्य करत आहेत त्यांना ‘अवधूत’ म्हणूनही ओळखले जाते आणि ते नर्मदा मिशनचे संस्थापक आहेत.

दादा गुरू महाराजांबद्दल महत्त्वाची माहिती

निराहार जीवन दादा गुरू महाराज गेल्या पावणे पाच वर्षांहून अधिक काळ अन्नाचा एकही कण न घेता केवळ नर्मदा नदीच्या पाण्यावर जगून एक ऐतिहासिक ‘महाव्रत’ पाळत आहेत. 

नर्मदा परिक्रमा – त्यांनी ४ लाख किलोमीटरहून अधिक पायी प्रवास केला असून अनेकदा नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे.

वैज्ञानिक संशोधन – त्यांच्या या चमत्कारी जीवनावर AIIMS (दिल्ली) आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांनी संशोधन केले आहे, ज्यात त्यांचे जीवन मापदंड सामान्य असल्याचे आढळून आले आहे

पर्यावरण संवर्धन- ते ‘नर्मदा मिशन’च्या माध्यमातून नर्मदा नदीच्या स्वच्छतेचा आणि वृक्षारोपणाचा संदेश देतात.

आध्यात्मिक ऊर्जा – त्यांना ‘अवधूत सिद्ध महायोगी’ मानले जाते आणि ते नर्मदा मातेचे उपासक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!