Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये प्रशासनाकडून हद्दखुणा निश्चितीस (मोजणीस) सुरूवात हद्दखुणा पुसल्यास दंडात्मक कार्यवाही करणार...

जामखेडमध्ये प्रशासनाकडून हद्दखुणा निश्चितीस (मोजणीस) सुरूवात हद्दखुणा पुसल्यास दंडात्मक कार्यवाही करणार – धनंजय बांगर

0
19

जामखेड न्युज—–

जामखेडमध्ये प्रशासनाकडून हद्दखुणा निश्चितीस (मोजणीस) सुरूवात

हद्दखुणा पुसल्यास दंडात्मक कार्यवाही करणार – धनंजय बांगर

जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला आहे यामुळे नागरिकांना धुळ, खाचखळगे, वाहतूक कोंडी समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी उपोषण केले होते. यावेळी हद्द निश्चिती करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. तहसीलदार धनंजय बांगर यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आज १ एप्रिल पासून हद्द निश्चिती कामास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

२०२३ मध्ये भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद, तहसील विभाग यांच्या वतीने
मोजमाप करून हद्दखुणा निश्चित केल्या होत्या, पण त्या अतिक्रमण धारकाना मान्य नसल्यामुळे त्या पुसल्या होत्या राष्ट्रीय महामार्ग बाबत वाद न्यायालयात गेला होता आतापर्यंत रस्ता रखडलेला आहे. आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने यामुळे आज पुन्हा हद्द निश्चिती कामास सुरुवात झाली आहे.

प्रकरण न्यायालयीन असल्यामुळे या खुणा कोणी पुसल्यास संबंधितावर कायदेशीर दंडात्मक कार्यवाही होईल असे तहसीलदार धनंजय बांगर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लवकरात लवकर अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन लवकरात लवकर अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. महसूल विभाग, भुमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हद्द निश्चिती करण्याचे काम सुरू झाले आहे.

आज बुधवार दि. १ रोजी पोलीस संरक्षणात राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, भूमी अभिलेख, तहसील विभाग, नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मोजणीस सुरूवात झाली आहे. आता लवकरात लवकर रस्ता पुर्ण व्हावा अशी मागणी होत आहे.

यावेळी नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, भुमी अभिलेखचे गिरीश आवारे, प्रविण भोकणळ, राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता दशरथ कासार यांच्या विभागाने आज मोजणीस सुरूवात केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!