Monday, March 23, 2026
Home ताज्या बातम्या सावधान!!! यात्रेत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – उज्वलसिंह राजपूत सांस्कृतिक...

सावधान!!! यात्रेत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – उज्वलसिंह राजपूत सांस्कृतिक कार्यक्रमास रितसर परवानगी घ्यावी

0
2

जामखेड न्युज—–

सावधान!!!
यात्रेत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – उज्वलसिंह राजपूत

सांस्कृतिक कार्यक्रमास रितसर परवानगी घ्यावी

तालुक्यातील दिघोळ येथील हनुमान जयंती निमीत्त होणा-या यात्रेमध्ये अडथळे आणणा-यांवर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी सांगितले.

दिघोळ यात्रा शांततेत संपन्न व्हावी म्हणून आज पोलीस उपनिरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष तसेच गावातील 35 ते 40 गावकरी उपस्तित होते.

1) दिघोळ गावचे ग्रामदैवत श्री.बजरंग बली यांची हनुमान जयंती निमीत्त मोठी यात्रा ही दिनांक 03/04/2026 व 04/04/2026 रोजी रोजी होणारा आहे.
2) दिनांक 03/04/2026 रोजी छबीना निघणार असुन तो रात्र भर गावातुन फिरवुन पाहटे मंदिराकडे घेवुण जातात.त्यानंतर दि 04/04/2026 रोजी कुस्त्याचे मैदान होते.
3) यात्रे मध्ये संकृतीक कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमास नियमाने परवाणगी घेणे आवश्यकच आहे.

( मा.जिल्हा अधिकारी सो यांच्या आदेशानुसार व नियमानुसार तसेच मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशाने ध्वनी क्षेपक वाजविण्याची मर्यादा व ठरवुन दिलेल्या दिवशी रात्री 12/00 वा पर्यत दिलेली सुट या बाबत परिपत्रक जारी केले आहे त्या परिपत्रका नुसार आपण हि वेळेत म्हणजे 10/00 वा सर्व वादय बंद होतील याची काळजी घ्यावी वेळे बाबत आम्ही कुठलही सुट देवु शकत नाही.

जिल्हाअधिकारी यांचे नियम आहे त्या नुसार वादय ला वेळ दिला जाईल त्याच्या पुढे वादय वाजविले तर ज्या पध्दतीने त्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहे त्या पध्दतीने कारवाई करण्यात येईल हा आदेश 17/02/2026 रोजी काढलेला आहे. त्या नुसार कारवाई होईल .तुमच्यामळे जे वाद्य मालक आहे त्यांना त्रास होणार नाही याची आपण गावकरी यांनी काळजी घ्यायची आहे.

4) छबिना दिनांक 03/04/2026 रोजी रात्री निघतो त्या वेळी पारंपारीक वाद्य वाजविले जाते तेच वादय वाजवुन छबिन्याची मिरवणुक काढावी.


5) यात्रेमध्ये काही ठरावीक लोक आहेत ज्यांच्या मुळे वाद निर्माण होण्याची शक्याता आहे. अशा लोकांनी सावध राहावे, बंदोबस्त हा जास्त असणार आहे. त्या मुळे पुढील कारवाई साठी तयार राहायच आहे. कोणाचीही गैय केली जाणारा नाही.
6) ग्रामपंचायत यांनी बोर्ड लावण्याची तजविज ठेवायची आहे. 7) यात्रे ठिकाणी छेडछाड होणार नाही याची काळजी घ्यावी व तसे काही असल्यास पोलीस स्टेशन ला कळवावे,

यात्रे साठी सर्व गावकरी यांना शुभेच्छा दिल्या व शांतता मिटिंग पार पडली.
सदर वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष तसेच गावातील 35 ते 40 गावकरी उपस्तित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!