Sunday, March 22, 2026
Home ताज्या बातम्या अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सचिन झगडे तर सचिव पदी अमोल...

अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सचिन झगडे तर सचिव पदी अमोल ठाणगे नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने राज्याला अनेक कायदे करण्यास भाग पाडले – शिवाजीराव ढाळे

0
3

जामखेड न्युज—–

अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सचिन झगडे तर सचिव पदी अमोल ठाणगे

नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने राज्याला अनेक कायदे करण्यास भाग पाडले – शिवाजीराव ढाळे

अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेमध्ये काही वर्षापूर्वी फुट पडत दोन संघटना झाल्या होत्या. आज दोन्ही संघटना परत एकत्रित येत नव्याने कार्यकारीणी जाहीर केली. यात जिल्हाध्यक्ष पदी श्रीगोंदा येथील सचिन झगडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, चांगदेव कडू, राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, एम. एस. लगड, रमजान हवालदार, पी. टी, गायकवाड, दिलीप ढवळे, भरत लहाने, सुर्यकांत कदम, मोहन यादव, अमोल भोंडवे, राजेंद्र खेडकर, कसबे डी. एस. यांच्या सह संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक सभासद उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे म्हणाले की, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील संघटनेच्या एकत्रिकरणासाठी जिल्ह्याने प्रयत्न केले
आपल्या संघटनेच्या एकत्रिकरणासाठी दुसऱ्याची गरज पडली नाही. अ. नगर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या दबावामुळे             

नगर जिल्ह्याने महाराष्ट्रला अनेक कायदे करण्यास भाग पाडले. एकेकाळी अ. नगर जिल्हा शिक्षक माध्यमिक संघटनेचा खुप मोठा दबदबा होता. संघटनेत फूट पडल्यामुळे दबदबा कमी झाला होता. आता पुन्हा एकत्रिकरण झाले आहे. पुन्हा आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी झोकून देऊन संघटनेचे काम करावे असे आवाहन ढाळे यांनी केले.

यावेळी बोलताना राजेंद्र लांडे म्हणाले की, संघटनेत काम करणाऱ्यांनी संघटनेसाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत त्याचा नीट अभ्यास करा, अधिकाऱ्यांकडून ते सोडवून घ्या राज्यात पुन्हा आपला दबदबा निर्माण करा असे आवाहन केले. 

यावेळी एम. एस. लगड, आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे , चांगदेव कडू यांनी ही आपले मनोगते व्यक्त केली.

निवड समितीने सर्वाच्या सहमतीने माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढील प्रमाणे निवडी केल्या व तालुक्यातील संघटनेची नुतन कार्यकारिणी एका महिन्यात तयार करण्याचे ठरले.

अध्यक्ष – सचिन झगडे – श्रीगोंदा
सचिव – अमोल ठाणगे पारनेर
खजिनदार – अशोक सोनवणे नेवासा
उपाध्यक्ष – भालचंद्र देशमुख – कर्जत, सचिन फटांगरे- संगमनेर, प्रसाद शिंदे -श्रीरामपूर, सोमनाथ सुंबे – नगर, सचिन जाधव – कोपरगाव,

सहसचिव – देविदास पाळवे- पाथर्डी, राज जाधव – राहुरी, रावसाहेब शेळके – अकोले, मोहन यादव- जामखेड,
हिशोब तपासनीस- संतोष अडकित्ते – शेवगाव, सातपुते – राहता

 

अशा प्रकारे निवडी करण्यात आल्या

निवड समिती – ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, चांगदेव कडू, एस. एम. लगड, राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे
अशा प्रकारे निवड समितीने वरील निवडी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!