आर्ट ऑफ लिविंग तर्फे खर्डा स्मशानभूमीत साफसफाई मोहीम
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील स्मशानभूमी साफसफाई मोहीम राबवून स्मशानभूमी स्वच्छता करण्याची अभियान आर्ट ऑफ लिविंग खर्डा परिवाराच्या माध्यमातून राबवण्यात आले.
शहरातील पूर्वेकड असलेल्या ईट रोड स्मशानभूमी येथे केर कचरा, प्लास्टिक कॅरीबॅग, बाटल्या, खराब कुजलेली लाकडं, बांबूचे तुकडे, झाडे, झुडपे , गवत, तन, फेकून दिलेले जुनाट कपडे, कुजलेल्या वस्तू आधी विविध कचरा साठल्यामुळे स्मशानभूमीची दुरवस्था झाली होती.
यामुळे खर्डा शहरातील आर्ट ऑफ लिविंग परिवाराने स्मशानभूमी स्वच्छता करण्याचे अभियान राबविले.
यामध्ये शहरातील आर्ट ऑफ लिविंग परिवारातील युवक, महिला यासह शहरातील सामाजिक संघटना, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनीही या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून स्मशानभूमी स्वच्छ करण्याचे काम केले.
या स्मशानभूमी स्वच्छता अभियानामध्ये आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक संतोष थोरात, रवी कुलकर्णी, गणेश जोगदंड, महेश लोंढे, प्रकाश सोनटक्के, डॉ अमोल वडे, गोकुळ गोलेकर ,राजेंद्र चव्हाण, धनसिंग साळुंखे ,संतोष साबळे, विशाल गोलेकर, जावेद सय्यद, विकास पवार, निलेश यादव, कल्याण सुरवसे, ज्ञानेश्वर इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जामखेड मार्केट कमिटीचे संचालक वैजनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, आर्ट ऑफ लिविंगचे महीला साधक वैशाली थोरात, मनीषा कुलकर्णी ,जया जोगदंड यांच्यासह ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून स्मशानभूमी स्वच्छ केली.
स्मशानभूमी स्वच्छतेच्या या अभियानाचे कौतुक सर्वत्र ग्रामस्थ करताना दिसून आले स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविल्यानंतर आर्ट ऑफ लिविंग चे साधक व ग्रामस्थांनी स्मशानभूमी येथेच सत्संग करून आर्ट ऑफ लिविंग चे भजन गाऊन सत्संग केला.
स्मशानभूमी स्वच्छतेचा संदेश व स्मशानभूमी मध्ये भजन गाऊन या अनोख्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होताना दिसून आली