Tuesday, April 14, 2026
Home ताज्या बातम्या गोळाफेक राष्ट्रीय स्पर्धेत प्रल्हाद साळुंखे यांना सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्व

गोळाफेक राष्ट्रीय स्पर्धेत प्रल्हाद साळुंखे यांना सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्व

0
31

जामखेड न्युज—–

गोळाफेक राष्ट्रीय स्पर्धेत प्रल्हाद साळुंखे यांना सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे नेतृत्व

 

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्रा. प्रल्हाद साळुंखे यांनी चंदिगड येथे सुरू असलेल्या खेलो मास्टर गेम्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 गोळा फेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले यामुळे वर्ल्ड मास्टर गेम्स 2027, कन्साई (जपान) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रा. साळुंखे यांची निवड झाली आहे.

जामखेड न्युजशी बोलताना प्रा. साळुंखे म्हणाले की, माझी निवड झाली आहे.पहिल्याच प्रयत्नात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे.

या यशामागे माझ्या कुटुंबीयांचा व संस्थेचा व मित्रमंडळी यांचा वाटा आहे.

साळुंखे यांच्या यशाबद्दल दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड अध्यक्ष उद्धवराव देशमुख,उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सचिव अरुणशेठ चिंतामणी, सहसेक्रेटरी डॉ.सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख व माजी सचिव शशिकांत देशमुख व माजी खजिनदार राजेश मोरे व सर्व संचालक,व प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक
दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे

 

ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व अध्यापक – प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचारी व पालक सर्वांनी अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!