जामखेड न्युज—–
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिकमधील अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो समोर आले होते.
त्यामुळे रुपाली चाकणकरांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. या प्रकरणावरून विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

या सर्व घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला असल्याचं सांगण्यात येत आहे.














