जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
आपण देशासाठी काही तरी देणे लागतो यासाठी मातृभुमीचे ऋण फेडण्यासाठी तरुणांनी सैन्य दलात भरती व्हावे. शिवनेरी अकॅडमीच्या माध्यमातून त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन अकॅडमीचे संचालक निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले
दि. १५ आॅगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हभप कैलास महाराज भोरे, प्रहार सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष कांतिलाल कवादे, डॉ. कैलास हजारे यांचेसह आजी-माजी सैनिक, शिवनेरी अकॅडमीतून सैन्य दलात भरती झालेले सैनिक, प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आदी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ADVERTISEMENT

यावेळी पुढे बोलताना कॅप्टन भोरे म्हणाले की आम्ही देशसेवेसाठी सैन्य दलासह विविध अशा संरक्षण दलांमध्ये भरतीसाठी जाणाऱ्या तरूणांना मार्गदर्शन व्हावे व ग्रामीण भागातील तरूण मोठ्या संख्येने सैन्य दलात भरती व्हावेत यासाठी शिवनेरी अकॅडमीची स्थापना केली होती. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हातील तरुण भरती झाले आहेत. अॅकॅडमीतून परिपूर्ण तयारी करून घेतली जात आहे. तसेच योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे येथे प्रशिक्षण घेऊन भरती होणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. तसेच येथे प्रवेश घेणारांचीही संख्या मोठी आहे. यामुळे मुलांनी व त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिवनेरी अकॅडमीला एकवेळ नक्की भेट द्यावी असे आवाहनही कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले.यावेळी कैलास महाराज भोरे, कांतीलाल कवादे, कैलास हजारे, प्रशिक्षणार्थी हर्षदा सुर्यवंशी, छोटा वक्ता अराध्य नागरगोजे यांनीही आपापली मनोगते व्यक्त केली.
दरम्यान यावेळी भोरे महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.






