जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – ( सुदाम वराट )
श्री साकेश्वर विद्यालयातील इयत्ता दहावीचा वर्ग कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून आज आॅफलाईन पद्धतीने सुरू करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना मास्क तसेच सॅनिटायझरचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन तपासणीसाठी थर्मल गण व आॅक्सीमीटर विद्यालयास देण्यात आले विद्यालय प्रशासनातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले तसेच आरोग्य विभागाच्या वतीने अॅटिजेन व आरटीपीसीआर कॅप विद्यालयात आयोजित करण्यात आला होता सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांची अॅटिजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करताना सरपंच हनुमंत पाटील, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाखरे, आरोग्य सेविका शिंदे एम. आर, आरोग्य सेवक लहू जेधे, आशा स्वयंसेविका मनिषा वराट, मनिषा सानप, उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, जाहेद बागवान, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर सर्व कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून दहावीचा वर्ग सुरु करण्याबाबतची शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीची परवानगी नंतर आज दहावीचा वर्ग आॅनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आला यावेळी आगोदर सर्व विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी तसेच आॅक्सिजन तपासणी करण्यात आली यानंतर सर्वाची अॅटिजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली अॅटिजेन मध्ये सर्व अहवाल निगेटिव्ह आले यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
मा. सरपंच हनुमंत पाटील यांच्यातर्फे श्री साकेश्वर विद्यालयास सॅनिटायझर, मास्क आॅक्सीमीटर व थर्मल गण वाटप करण्यात आले. याबद्दल विद्यालय प्रशासनाने हनुमंत पाटील यांचे आभार मानले.